विराट कोहली पुन्हा ‘नंबर वन’ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्माला टाकले मागे
ICC ODI Rankings : भारताचा माजी कर्णधार आणि सुपरस्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनला आहे.
ICC ODI Rankings : भारताचा माजी कर्णधार आणि सुपरस्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनला आहे. रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शानदार खेळी करत 93 धावा केल्या होत्या. तर यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत देखील तो शानदार फॉर्मात होता.
या एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन फलंदाज होता, परंतु पहिल्या सामन्यानंतर तो तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. रोहित शर्मा वडोदरा येथे मोठी खेळी खेळू शकला नाही मात्र विराट कोहलीने (Virat Kohli) दमदार खेळी खेळली. तर या क्रमवारीत न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर गेला आहे. त्याने या सामन्यातही दमदार खेळी खेळली.
डॅरिल मिशेलने (Daryl Mitchell) 71 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 84 धावा केल्या. दरम्यान, रोहित शर्माने 29 चेंडूत फक्त 26 धावा केल्या, त्यामुळे त्याचे अव्वल स्थान गमावले. रोहित शर्मा पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. रेटिंग पॉइंट्सच्या बाबतीत, डॅरिल मिशेल 784 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर विराट कोहली 785 गुणांसह आहे. रोहित शर्माचे 775 गुण आहेत.
आम्ही फक्त अॅक्शनला रिअॅक्शन दिली अन्… अजित पवार – भाजप वादावर मुरलीधर मोहळ स्पष्टच बोलले
रोहित आणि विराटमध्ये 10 गुणांचे अंतर आहे. अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान चौथ्या स्थानावर आहे आणि भारतीय कर्णधार शुभमन गिल पाचव्या स्थानावर आहे. झद्रानचे 764 गुण आहेत आणि गिलचे 725 गुण आहेत. श्रेयस अय्यरचाही आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत टॉप 10 मध्ये समावेश आहे. विराट कोहलीचे 2018 मध्ये एकदिवसीय रेटिंग पॉइंट्स 909 होते.
