IND vs NZ ODI Series: आज होणार भारतीय संघाची घोषणा; शमी, पंतसह ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी?
IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे.
IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती आज दुपारी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या मालिकेसाठी भारतीय संघात स्टार गोलंदाज मोहम्मद शमीची निवड होऊ शकते. विजय हजारे ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना शमीने आतापर्यंत शानदार गोलंदाजी केल्याने त्याची पुन्हा एकदा भारतीय संघात निवड होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या नावावर देखील निवड समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात इशान किशनसह ऋषभ पंतची देखील निवड होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ध्रुव जुरेलला या संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे.
पंतने जुलै 2024 ते डिसेंबर 2025 दरम्यान फक्त (IND vs NZ ODI Series) एकच एकदिवसीय सामना खेळला आहे. तर दुसरीकडे पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवड समिती हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देत या मालिकेसाठी मोहम्मद शमीसह (Mohammed Shami) मोहम्मद सिराजला संधी देण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या मालिकेसाठी हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळणार की नाही याबाबत कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नाही.
व्यवसायात मिळणार यश अन् होणार बंपर फायदा; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल?
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा संभाव्य संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
