IND vs NZ : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला धक्का, न्यूझीलंडचा 7 विकेट्सनी विजयी

IND vs NZ : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्युझीलंडने शानदार कामगिरी करत 7 विकेट्सने भारताचा पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडने तीन

  • Written By: Published:
 IND Vs NZ

IND vs NZ : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्युझीलंडने शानदार कामगिरी करत 7 विकेट्सने भारताचा पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने विजयासाठी न्यूझीलंडसमोर 285 धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्युझीलंडकडून डॅरिन मिशेल आणि विल यंगने शानदार कामगिरी करत भारताला मोठा धक्का दिला.

मिशेलने (Darin Mitchell) 117 चेंडूत नाबाद 131 धावा केल्या, त्यात 11  चौकार आणि दोन षटकार मारले. यंगने (Will Young) 98 चेंडूत 87 धावा केल्या, ज्यात सात चौकारांचा समावेश होता. 285 धावांचा पाठलाग करताना न्युझीलंडची सुरुवात खूप खराब झाली होती. भारताकडून हर्षित राणाने डेव्हॉन कॉनवे (16) ला बाद करत न्युझीलंडला पहिला धक्का दिला होता. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने 13 व्या षटकात हेन्री निकोल्स (10) ला बाद करत न्युझीलंडला बॅकफूटवर नेले होते मात्र यानंतर डॅरेन मिशेल आणि विल यंगने 162 धावांची भागीदारी केली.

तर दुसरीकडे प्रथम फलंदाजी करत भारताने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 287 धावा केल्या. केएल राहुलने (KL Rahul) शानदार शतक झळकावले. त्याने 92 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 112 धावा केल्या. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने चांगली सुरुवात केली. कर्णधार शुभमन गिल (53 चेंडूत) आणि रोहित शर्मा (38 चेंडूत 24 ) यांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावा जोडल्या. मात्र 118 धावांवर भारताने तीन विकेट गमावल्यानंतर राहुलने शानदार फलंदाजी केली. त्याने रवींद्र जडेजा (44 चेंडूत 24) सोबत पाचव्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुलने नितीश कुमार रेड्डी (21 चेंडूत 20) सोबत सहाव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली.

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी इंदूरमध्ये होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्युझीलंडचा चार विकेटने पराभव केला होता.

follow us