SMAT 2025 : मोहम्मद शमीची शानदार कामगिरी, 4 विकेट घेत भारतीय संघात कमबॅकसाठी ठोकला दावा!
SMAT 2025: भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. शमी फॉममध्ये नसल्याने त्याला भारतीय
SMAT 2025 : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. शमी फॉममध्ये नसल्याने त्याला भारतीय संघात स्थान देण्यात येत नसल्याचा दावा बीसीसीआयकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मोहम्मद शमीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्व्हिसेविरुद्ध शानदार कामगिरी करत बीसीसीआयला मी फॉमात असल्याचे स्पष्ट मेसेज दिले आहे. शमीने सर्व्हिसेसविरुद्ध चार विकेट घेत भारतीय संघात कमबॅकसाठी दावा ठोकला आहे. या सामन्यात शमीने शानदार गोलंदाजी करत चार ओव्हरमध्ये 13 धावांत चार विकेट घेतले तर दुसरीकडे आकाशदीपने 27 धावांत तीन विकेट घेतले.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (SMAT 2025) ग्रुप सी सामन्यात बंगालने सर्व्हिसेसचा सात विकेट्सने पराभव केला. हा बंगालचा पाच सामन्यांतील चौथा विजय होता आणि अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील संघाने 16 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यात ईश्वरनने 37 चेंडूंत 58 धावा केल्या आणि अभिषेक पोरेल (29 चेंडूंत 56 धावा) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 93 धावा जोडल्या ज्यामुळे बंगालला फक्त 15.1 षटकांत 166 धावांचे लक्ष्य गाठता आले.
सामनावीर म्हणून निवडलेल्या शमीने 13 धावांत चार बळी घेतले, तर आकाशदीपने 27 धावांत तीन बळी घेतले, ज्यामुळे सर्व्हिसेस 18.2 षटकांत 165 धावांत बाद झाली. ऋतिक चॅटर्जीनेही 32 धावांत दोन बळी घेतले.
तर दुसरीकडे मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) या शानदार कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट चाहाते आता मोहम्मद शमीला भारतीय संघात पुन्हा एकदा स्थान देण्यात यावे अशी मागणी करत बीसीसीआयसह अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार टीका करताना सोशल मीडियावर दिसत आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (INDvsSA) सुरु असणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला 359 धावांचा लक्ष्य देखील वाचवता आलं नसल्याने चाहाते मोहम्मद शमी भारतीय संघातून बाहेर का? असं देखील आता विचारत आहे.
नगरपरिषद अन् नगरपंचायतीच्या निकालावर आज होणार फैसला, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
पंजाबने पुडुचेरीचा पराभव केला
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या एका ग्रुप सामन्यात पंजाबने एकतर्फी सामन्यात पुडुचेरीचा 54 धावांनी सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने सलील अरोरा यांच्या 44 आणि अभिषेक शर्मा यांच्या 34 धावांच्या जोरावर पाच विकेट्सने 192 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, पुडुचेरी 18.4 षटकांत 138 धावांवर गारद झाली. पुडुचेरीकडून सिदक सिंगने सर्वाधिक 61 धावा केल्या, परंतु इतर फलंदाजांकडून त्याला आवश्यक असलेली साथ मिळाली नाही. पंजाबकडून अभिषेकने 23 धावा देत तीन विकेट्स घेतल्या.
