रोहित शर्मा देणार पांड्याला धक्का, प्लेइंग 11 मध्ये खेळणार ‘हा’ स्टार खेळाडू

रोहित शर्मा देणार पांड्याला धक्का, प्लेइंग 11 मध्ये खेळणार ‘हा’ स्टार खेळाडू

T20 World Cup 2024: 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषकाची (T20 World Cup 2024) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ (Team India) अमेरिकेत पोहोचला आहे. भारतीय संघाला या स्पर्धेपूर्वी एकमेव सराव सामना बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) खेळायचा आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने नेटमध्ये प्रचंड घाम गाळला.

समोर आलेल्या माहितीनुसार, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) जागी प्लेइंग 11 मध्ये दुसऱ्या खेळाडूला स्थान देणार आहे. माहितीनुसार, हा खेळाडू शिवम दुबे (Shivam Dubey) आहे. नेट सरावात शिवम दुबेने रोहितला गोलंदाजी देखील केली. यावेळी रोहितने शिवम दुबेला त्याच्या गोलंदाजीबाबत टिप्स दिल्या. नेटमध्ये फलंदाजी करत असताना रोहित शिवमला सांगत होता की, जर त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला तर फलंदाज त्याला कसा मारेल.

तर यापूर्वी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामध्ये सर्व काही ठीक नाही अशा अनेक बातम्या मीडियामध्ये येत होते. टी-20 विश्वचषकाची संघाची निवड करताना त्याचा आयपीएल फॉर्म लक्षात घेत रोहित आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना तो संघात नको होता मात्र त्याची जबरदस्तीने निवड करण्यात आल्याचा दावा देखील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

अग्रवाल पिता-पुत्रास दिलासा? दोघांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी

यामुळे टी-20 विश्वचषकामध्ये रोहित शर्मा हार्दिक पांड्याला धक्का देत प्लेइंग 11 मध्ये शिवम दुबेला संधी देऊ शकते. आयपीएलमध्ये शिवम दुबे जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने सीएसकेसाठी अनेक सामन्यात महत्वपूर्व कामगिरी केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube