भारतीय संघात होणार मोठा बदल? बीबीसीआय ‘या’ पदासाठी मागविणार अर्ज

भारतीय संघात होणार मोठा बदल? बीबीसीआय ‘या’ पदासाठी मागविणार अर्ज

Team India New Coach : आगामी T20 विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून (BCCI) भारतीय संघांची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये 2 जूनपासून T20 विश्वचषकाची (T20 World Cup 2024) सुरुवात होणार आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार भारतीय संघाला विश्वचषकानंतर नवा मुख्य प्रशिक्षक मिळू शकतो.

सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता मात्र त्यानंतर त्यांच्या कार्यकाळ T20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला आहे. आता त्यांच्या कार्यकाळ जूनमध्ये संपणार असल्याने जूननंतर भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक मिळू शकते.

याबाबत माहिती देताना बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) म्हणाले, सध्याच्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार आहे. त्यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले जाणार आहे. भारतीय संघ T20 विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वीच मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले जातील असं जय शहा म्हणाले.

जर राहुल द्रविडला टी-20 विश्वचषकानंतरही या पदावर राहायचे असेल तर ते पुन्हा अर्ज करू शकतात. आम्ही नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती तीन वर्षांसाठी करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली . तसेच उर्वरित बॅकरूम स्टाफची नियुक्ती नवीन मुख्य प्रशिक्षकाशी सल्लामसलत करून केली जाईल याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

तिन्ही फ़ॉरमॅटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक ?

जय शाह म्हणाले, सध्या भारतीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक असण्याचा ट्रेंड नाही. आमच्याकडे अनेक खेळाडू आहे जे सर्व फॉरमॅटमध्ये खेळतात.

चौथ्या टप्प्यात घमासान! पाच मंत्री, एक माजी CM, दोन क्रिकेटर अन् अभिनेते मैदानात

शेवटी हा निर्णय क्रिकेट सल्लागार समितीला घ्यायचा आहे. समिती जो निर्णय त्याची अंमलबजावणी आम्ही करेन. जर समितीला परदेशी प्रशिक्षक हवा असेल तर मी हस्तक्षेप करणार नाही असं जय शाह म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube