टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; जसप्रीत बुमराह लवकरच मैदानात
BCCI issues medical update of Jasprit Bumrah : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)ने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)आणि फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांची वैद्यकीय अपडेट जारी केलं आहे. वैद्यकीय अपडेटमध्ये सांगितलंय की, जसप्रीत बुमराहची न्यूझीलंडमध्ये (New Zealand)त्याच्या पाठीच्या खालच्या भागावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. तज्ज्ञांनी वेगवान गोलंदाजाला शस्त्रक्रियेनंतर सहा आठवड्यांनंतर त्याचे पुनर्वसन सुरु करण्याचा सल्ला दिला होता. म्हणूनच बुमराहने शुक्रवारपासून बेंगळुरू (Bangalore)येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे त्याचे पुनर्वसन व्यवस्थापन सुरू केले आहे.त्यामुळे आता जसप्रीत बुमराह लवकरच मैदानात दिसणार आहे. अर्थातच ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे.
बीसीसीआयने टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू श्रेयस अय्यरबाबतही अपडेट दिली आहे. श्रेयस अय्यरला पाठीच्या खालच्या भागावर पुढील आठवड्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती बीसीआयने दिली आहे. तो दोन आठवडे सर्जनच्या देखरेखीखाली असेल आणि नंतर पुनर्वसनासाठी एनसीएकडे परत येईल.
श्रेयस अय्यर क्रीकेट लीग 2023 मधून बाहेर पडला आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिकाही पूर्ण करता आली नाही. टीम इंडियासाठी एक प्रकारे आनंदाची बातमी आहे, कारण बुमराह आता एनसीएमध्ये गेला आहे.
एका वृत्तसंस्थेच्या हवाल्याने सांगितले की, जसप्रीत बुमराह बीसीसीआय विश्वचषक 2023 पूर्वी तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. खेळाडू बुमराहची शैली काय आहे? हे सर्वांनाच माहीत आहे. त्याने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत.
जसप्रीत बुमराह मैदानात कधी परतणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. यात अजून 6 महिन्यांचा कालावधी बाकी आहे.