Karnataka Election : येदियुरप्पांच्या नातवाचाच भाजपला राम राम, ‘या’ पक्षाच्या तिकिटावर लढणार निवडणूक
Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणूकीला आता एक महिन्यापेक्षा कमी काळ शिल्लक आहे. पण सत्ताधारी भाजपला मात्र एकामागून एक धक्के बसत आहेत. आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा (Yediyurappa) यांचे नातवानेच भाजपला राम राम करून जनता दल एस म्हणजेच कुमारस्वामी यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
येदियुरप्पा यांचे नातू एनआर संतोष (NR Santhosh) यांनी आज एचडी कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत जेडीएसमध्ये प्रवेश केला. संतोष हे हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे मतदारसंघातून जेडीएसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. संतोष हे येदियुरप्पा यांच्या बहिणीचे नातू आहेत. ते येदियुरप्पा यांच्या जवळचे मानले जात होते. त्यांनी काही काळ येदियुरप्पा यांचे सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते अर्सिकेरे मतदारसंघात कार्यरत आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय; सशस्त्र पोलीस दलाची परीक्षा मराठीसह 13 भाषांमध्ये देता येणार
भाजपने अर्सिकेरेमधून एनआर संतोष यांना तिकीट दिले नाही. त्या जागी भाजपकडून जीव्ही बसवराजू यांना तिकीट दिले गेलं आहे.तिकीट न मिळाल्याने संतोष यांनी शुक्रवारी रात्री माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची भेट घेतली आणि त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याच नक्की केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार एचडी देवेगौडा यांनी संतोषला अर्सिकेरे मतदारसंघातून तिकीट देण्याचे आश्वासन दिले आहे.
सर्वच राजकीय पक्षाकडून आता उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत. पण यामध्ये तिकिटाच्या घोषणेनंतर भाजपमध्ये मोठी बंडखोरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे बंडखोरी रोखणं हे भाजप हायकमांडची मोठी डोकेदुखी बनली आहे.
Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत
दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 43 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. भाजपातून (BJP) बंडखोरी करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांना तिकीट मिळाले आहे. 43 उमेदवारांच्या जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत कोलार विधानसभा मतदारसंघातून केजी मंजुनाथ (KG Manjunath) यांनाही तिकीट देण्यात आले आहे.