काय सांगता! UPI पेंमेंटसह मोबाईलचे सर्व काम करणार ‘हे’ ग्लासेस; जाणून घ्या फीचर्स
Oakley Meta Vanguard : भारतीय बाजारात मेटा आणि ओकली यांनी संयुक्तपणे खेळाडू आणि आउटडोर यूजर्ससाठी ओकली मेटा व्हॅनगार्ड स्मार्टग्लासेस
Oakley Meta Vanguard : भारतीय बाजारात मेटा आणि ओकली यांनी संयुक्तपणे खेळाडू आणि आउटडोर यूजर्ससाठी ओकली मेटा व्हॅनगार्ड स्मार्टग्लासेस लाँन्च केले आहे. बाजारात हे रे-बॅन मेटा ग्लासेसचे नवीन स्पोर्ट्स व्हर्जन मानले जात आहे. यात कंपनीकडून एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने ग्राहकांना 12-मेगापिक्सेल कॅमेरा, फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि मेटा एआय इंटिग्रेशन सारखे फीचर्स दिले आहे. ज्यामुळे यूजर्स या ग्लासेसचा वापर करुन फोटो, व्हिडिओ काढू शकतात. तसेच काॅल करु शकतात आणि एआय असिस्टंटची देखील मदत घेऊ शकतात. या ग्लासेसमध्ये हिंदी भाषा आणि यूपीआय लाइट देखील सपोर्ट करणार आहे.
आउटडोर किंमत, व्हरियंट आणि उपलब्धता
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय बाजारात ओकली मेटा व्हॅनगार्डची किंमत 52,300 पासून सुरु होते. सनग्लास हट, लेन्सक्राफ्टर्स आणि देशभरातील आघाडीच्या ऑप्टिकल स्टोअरमध्ये खरेदीसाठी मेटा व्हॅनगार्ड स्मार्टग्लासेस उपलब्ध आहे.
ग्राहकांना हे ग्लासेस चार व्हेरियंटमध्ये खरेदी करता येणार आहे. प्रत्येकामध्ये वेगवेगळे प्रिझम लेन्स पर्याय आहेत: प्रिझम 24के, प्रिझम ब्लॅक, प्रिझम रोड आणि प्रिझम सॅफायर लेन्स पर्याय, ब्लॅक आणि व्हाइट फ्रेमसह भारतीय बाजारात लाँन्च झाले आहे.
स्पोर्ट्स डिझाइन
ओकली मेटा व्हॅनगार्ड खेळाडू आणि आउटडोर यूजर्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे. रॅपअराउंड डिझाइन डोळ्यांना इष्टतम कव्हरेज आणि संरक्षण प्रदान करते. अंदाजे 66 ग्रॅम वजनाचे आहे. ते IP67 रेटिंग असलेले आहे, ज्यामुळे ते धूळ- आणि पाण्याचे प्रतिरोधक बनते. प्रिझम लेन्स तंत्रज्ञान सूर्यप्रकाश, वारा आणि धूळ यांचे परिणाम कमी करते.
कॅमेरा, ऑडिओ आणि नियंत्रण फीचर्स
ओकली मेटा व्हॅनगार्ड स्मार्टग्लासेस 12-मेगापिक्सेल कॅमेरा आहे, जो 122-अंश फील्ड ऑफ व्ह्यूसह फर्स्ट पर्सन व्ह्यू रेकॉर्डिंग प्रदान करतो. यूजर्स पाच मिनिटांपर्यंत 30fps वर 1080p व्हिडिओ आणि तीन मिनिटांपर्यंत 60fps रेकॉर्ड करु शकतात. 3K रिझोल्यूशनवर मर्यादित-वेळ रेकॉर्डिंग देखील शक्य आहे, जे फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या मेटा अॅप्सवर शेअर केले जाऊ शकते. यात ओपन-इअर स्पीकर्स आणि पाच-मायक्रोफोन सेटअप आहे. यात एक नवीन अॅक्शन बटण आणि कस्टम बटण कॅमेरा आणि मोड नियंत्रणे आहेत.
मेटा एआय, हिंदी सपोर्ट आणि बॅटरी
ओकली मेटा व्हॅनगार्डमध्ये मेटा एआय इंटिग्रेशन आहे, जे “हे मेटा एआय” असे म्हणत सक्रिय केले जाऊ शकते. यूजर्स याच्या मदतीने गाणी ऐकणे, प्रश्न विचारणे, मेसेज वाचणे आणि आवाजाद्वारे मीडिया नियंत्रित करणे यासारखी कामे करू शकतात. तर हिंदी भाषेचा सपोर्ट, हिंदी व्हॉइस इंटरॅक्शन आणि यूपीआय लाइट पेमेंट कंट्रोल्स देखील यात देण्यात आले आहे.
पार्थ पवारांवर टांगती तलवार कायम, मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात मोठा ट्विस्ट
एआय व्हॉइस पर्यायात दीपिका पदुकोणचा आवाज आहे. कनेक्टिव्हिटी ब्लूटूथ 5.3 आणि वाय-फाय 6E द्वारे समर्थित आहे. डिव्हाइसमध्ये 32GB स्टोरेज आहे आणि सामान्य वापरात बॅटरी लाइफ नऊ तासांपर्यंत आणि चार्जिंग केससह 36 तासांपर्यंत असल्याचा दावा केला जातो.
