अणुयुद्ध, AI आणि जैविक शस्त्रांसह आजार… पुढील 74 वर्षांत येणाऱ्या पिढ्यांवर घोंवणार मोठी संकटं
crises looming over future generations वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित जर्नल ‘द लॅन्सेट’च्या एका अहवालातून करण्यात आला आहे.
Nuclear war, AI, biological weapons and diseases crises looming over future generations in next 74 years. : अणुयुद्ध, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) गैरवापर आणि जैविक शस्त्रांसह 17 गंभीर धोके मानवजातीच्या अस्तित्वासाठी कारणीभूत ठरू शकतात, असा खुलासा वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित जर्नल ‘द लॅन्सेट’च्या एका अहवालातून करण्यात आला आहे. या अहवालाला ‘द लॅन्सेट कमिशन ऑन 21st सेंच्युरी ग्लोबल थ्रेट्स टू हेल्थ’ असे नाव देण्यात आले आहे. या आयोगाने पुढील 74 वर्षांत मानवी आरोग्यासमोर उभ्या राहू शकणाऱ्या 17 मोठ्या धोक्यांची यादी तयार केली आहे. सध्याच्या परिस्थितीतील कल लक्षात घेऊन या धोक्यांमुळे आजार, अपंगत्व किंवा अकाली मृत्यू यांमुळे किती निरोगी आयुष्याची वर्षे वाया जाऊ शकतात, याचा अंदाज तज्ज्ञांनी या अभ्यासात घेतला आहे.
कोणते आहेत हे धोके?
‘द लॅन्सेट’च्या अहवालानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेचा दुष्ट हेतूने केला जाणारा वापर, त्यात AI च्या मदतीने तयार करण्यात येणारी जैविक शस्त्रे आणि अणुयुद्धानंतर निर्माण होणारा ‘न्यूक्लियर फॅमिन’ अर्थात अणुदुष्काळ, या धोक्यांमुळे पुढील 75 वर्षांत मानवजातीच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अणुयुद्ध झाल्यास वातावरणाच्या वरच्या थरांमध्ये मोठ्या प्रमाणात कण जमा होऊ शकतात. त्यामुळे सूर्यप्रकाश अडवला जाऊन शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते आणि परिणामी भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.या अहवालासोबत प्रसिद्ध झालेल्या ‘द लॅन्सेट’च्या लेखात इशारा देण्यात आला आहे की, हे धोके प्रत्यक्षात उतरले, तर त्यातून होणारे नुकसान मानवजातीसाठी एखाद्या महाप्रलयासारखे असेल. अणुयुद्धानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचाही गंभीर धोक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
इतर 15 मोठे धोके कोणते?
ज्या धोक्यांमुळे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यांना मोठ्या विनाशकारी धोक्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या यादीत पुढील 15 धोक्यांचा समावेश आहे.
दुष्काळात आगीच्या झळा! बीड जिल्ह्यात गंजीला आग लागून सोयाबीनची राखरांगोळी
वायुप्रदूषण, अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स अर्थात औषधांचा परिणाम कमी होणे किंवा औषधे निष्प्रभ ठरणे, लहान मुलांमधील कुपोषण, हवामान संकट, पारंपरिक युद्ध, श्रीमंत देशांकडून परदेशी मदतीत केली जाणारी कपात, मद्याचे अतिसेवन, उच्च रक्तदाब, उत्पन्नातील असमानता, शिक्षणाचा अभाव, नैसर्गिकरीत्या पसरणाऱ्या साथीचे रोग, लठ्ठपणा, बिघडलेले मानसिक आरोग्य, धूम्रपान, वाढत्या वयाशी संबंधित आजार, या यादीत एखाद्या धोक्याचा समावेश करण्यासाठी दोन अटी निश्चित करण्यात आल्या होत्या. त्या धोक्यामुळे मोठ्या प्रमाणात निरोगी आयुष्याच्या वर्षांचे नुकसान होण्याची शक्यता असावी आणि त्यावर उपाय करण्याचा काही संभाव्य मार्गही उपलब्ध असावा.
श्रीमंत आणि गरीब देशांमध्ये धोक्यांचे स्वरूप वेगळे
अहवालानुसार, श्रीमंत देशांमध्ये लठ्ठपणा आणि बिघडलेले मानसिक आरोग्य यांसारखे असंसर्गजन्य आजार हे आरोग्यासमोरील मोठे धोके आहेत. याउलट, कमी उत्पन्न असलेल्या प्रदेशांमध्ये शिक्षणाचा अभाव यांसारख्या कारणांमुळे आरोग्याचे सर्वाधिक नुकसान होत आहे. या अहवालातील मॉडेलनुसार, जागतिक तापमानवाढ 4.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याऐवजी ती सुमारे 1.8 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यात यश आले, तर 1.89 अब्ज निरोगी आयुष्याच्या वर्षांचे नुकसान टाळता येऊ शकते. दरम्यान, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक मोठ्या देणगीदार देशांनी गेल्या वर्षभरात परदेशी मदतीवरील खर्चात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे.
लोकांना घाबरवणे हा उद्देश नाही
‘द लॅन्सेट कमिशन’चे सदस्य आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील (UCL) प्राध्यापक इब्राहिम अबुबकर यांनी स्पष्ट केले की, लोकांना घाबरवणे हा या अभ्यासामागील उद्देश नाही. धोरणकर्त्यांसमोर कोणते धोके आहेत आणि त्यावर वेळीच उपाययोजना केल्यास किती मोठा फरक पडू शकतो, हे दाखवून देणे हा या अहवालाचा मुख्य हेतू आहे. ‘द लॅन्सेट कमिशन’शी संबंधित आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनचे संचालक प्रा. क्रिस्टोफर मरे यांनी सांगितले की, आजचे नेते जे निर्णय घेतील, त्यावर पुढील पिढ्यांचे आरोग्य अवलंबून असेल.
सौरव दास आणि आशुतोष रांकाची तिहार तुरुंगात रवानगी; न्यायालयाकडून 5 दिवसांची कोठडी
तीन वर्षांपूर्वी या अभ्यासाला सुरुवात झाली, तेव्हा संघर्ष, हवामान संकट आणि साथीचे आजार हे तीनच प्रमुख धोके असल्याचे मानले जात होते. मात्र, अभ्यासातून समोर आले की, मानवजातीसमोर असलेल्या धोक्यांची संख्या यापेक्षा खूप मोठी आहे. त्यांच्या मते, सरकारांनी संभाव्य संकटांचा आधीच अंदाज घेणे, त्यांना रोखण्यासाठी उपाययोजना करणे आणि संकटांना सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी पुरेसा निधी आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची तरतूद करणे गरजेचे आहे.
पुढे काय होणार?
‘द लॅन्सेट कमिशन’ दरवर्षी या 17 धोक्यांचे पुनर्मूल्यांकन करणार आहे. त्यामध्ये नवीन आकडेवारी आणि भविष्यात समोर येणाऱ्या नव्या धोक्यांचाही समावेश केला जाणार आहे. संकट गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच त्यावर उपाययोजना करण्याचे आवाहन अहवालाच्या लेखकांनी जागतिक नेत्यांना केले आहे.
SIR विरोधात राहुल गांधींची याचिका दाखल; सर्वोच्च न्यायालयात 26 ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता
यासाठी तांत्रिक नवकल्पनांमध्ये गुंतवणूक करणे आणि आरोग्यव्यवस्था अधिक मजबूत करणे यांसारख्या उपायांवर भर देण्यात आला आहे. या अहवालाचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे, प्रत्येक धोक्याला सामोरे जाण्यासाठी व्यावहारिक उपाय उपलब्ध आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी वेळेत होणे आवश्यक आहे.