प्रतीक्षा संपली! उद्या लाँच होणार देशातील पहिली CNG Bike, किंमत असणार फक्त …

प्रतीक्षा संपली! उद्या लाँच होणार देशातील पहिली CNG Bike, किंमत असणार फक्त …

Bajaj CNG Bike : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे भारतीय बाजारात सीएनजी कार्सची (CNG Cars) मागणी झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे आता देशात नवीन नवीन फीचर्ससह सीएनजी कार्स लाँच होत आहे. यातच आता देशातील लोकप्रिय ऑटो कंपनी बजाज (Bajaj) 5 जुलै रोजी म्हणजेच उद्या देशातील पहिली सीएनजी बाईक (CNG Bike) लाँच करणार आहे.

माहितीनुसार, पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान बजाज ही बाइक लाँच करणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून या बाइकमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात येणार आहे. उद्या 5 जुलै रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान ही बाईक लाँच करण्यात येणार आहे. मात्र अद्याप कंपनीकडून या बाइकच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

माहितीनुसार, कंपनी भारतीय बाजारात Bajaj Freedom 125 CNG या नावाने ही बाइक लाँच करू शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही बाइक सीएनजीसह पेट्रोलवर देखील चालणार आहे. तसेच ही बाइक तब्बल 100 किलोमीटर प्रति किलोग्रामपर्यंत मायलेज देणार असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.

बाजारात ही बाइक अनेक व्हेरियंटमध्ये आणि रंगामध्ये लाँच होणार आहे. तसेच या बाइकमध्ये राऊंड हेडलाईन, लॉन्ग सीट ज्याखाली सीएनजी सिलेंडर असणार आहे. तसेच ट्यूबलेस टायर्स, अलॉय व्हील आणि हाय ग्राउंड क्लीयरन्ससह एकूण ADV स्टाइल सारखे फीचर्स या बाइकमध्ये कंपनीकडून देण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे कंपनीने अद्याप Bajaj Freedom 125 CNG ची किंमत जाहीर केलेली नाही. मात्र काही रिपोर्ट्सनुसार भारतीय बाजारात या बाइकची एक्स शोरूम किंमत 90 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत असू शकते. तसेच कंपनीने ग्राहकांच्या सवलतीसाठी बॅकअप म्हणून या बाइकमध्ये लहान पेट्रोल टाकी देखील दिली आहे.

टीम इंडियाचे शिलेदार मोदींच्या भेटीला; खास वेलकम करत मोदींनी दिल्या शुभेच्छा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या