Team India: भारतीय टीमच्या स्वागताला गुजरातहून बस का मागवल्या? राऊतांनी केला मोठा खुलासा
Indian Cricket Team : भारतीय क्रिकेट संघ काल ४ जुलै रोजी मुंबईत आले होते. त्यांच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी मरीन ड्राईव्हवर जमली होती. पंरतु, या रोड शोला गुजरातहून बस मागवण्यात आली होती. (Cricket Team) त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. जिथं संकट आहे, समस्या आहे, लोक त्रासले आहेत. हाथरस, मणिपूरसारख्या ठिकाणी पंतप्रधान कधीच जात नाहीत. मात्र, (Team India) भारतीय क्रिकेट टीमला भेटायला मोदींकडे वेळ आहे अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली आहे.
Team India : विजयाचा जल्लोष, वानखडे स्टेडियममध्ये टीम इंडियाने धरला ढोल ताशावर ठेका, पाहा व्हिडिओ
आमचं गुजराती समाजाशी, गुजराती लोकांशी आमचा वाद नाही. हा वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीही याचं समर्थन केलं आहे. दरम्यान, भाजपने ही असली फालतू चाटूगीरी बंद करावी असा घणाघात करत महाराष्ट्राचं महत्व कमी करण्यासाठी गुजरातमधून बस मागवल्या असा थेट आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला आहे.
त्यांना भेटलंच पाहिजे. त्यांनी भेटू नये असं मी म्हणत नाही. त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत. पण ज्या राज्यातून लोकसभेतून निवडून आले आहात त्या राज्यातील सर्वांत मोठा अपघात घडला आहे. तिथं तुम्ही जात नाहीत. मणिपूरलाही तुम्ही गेला नाहीत. मग तुम्ही काय करू शकता? असा प्रश्न उपस्थित करत जिथं जय असतो तिथे पंतप्रधान जातात. आपल्या निवासस्थानी सर्वांना बोलावतात. जसं काय ती ट्रॉफी त्यांनीच जिंकली आहे, असा त्यांचा वावर आहे असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.
Team India Road Show : न भूतो न भविष्यति जल्लोत्सव, मरीन ड्राईव्हवर उसळला जनसागर
दरम्यान, या टीमच्या स्वागतासाठी गुजरातमधून बस आणावी लागली याचा अर्थ काय? आपल्या ताफ्यात अशा बसेस आहेत. नसती तर एका रात्रीत बनवून घेतली असती एवढी मुंबईची क्षमता आहे. गुजरात आहे म्हणून देश आहे असं दाखवून देताय का? असा प्रश्न उपस्थित करत हे महाराष्ट्राला कमी दाखवण्याचा प्रयत्न आहे असा थेट आरोपही राऊतांनी यावेळी केला.