Team India Road Show : न भूतो न भविष्यति जल्लोत्सव, मरीन ड्राईव्हवर उसळला जनसागर
टी - 20 क्रिकेट (T-20)स्पर्धेत टीम इंडियाने (Indian team) दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केल्यानंतर भारतीय संघ आज मायदेशी परतला.

Team India Mumbai Road Show: टी - 20 क्रिकेट (T-20)स्पर्धेत टीम इंडियाने (Indian team) दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केल्यानंतर भारतीय संघ आज मायदेशी परतला.

विश्वविजेत्या ठरलेला भारतीय संघाचे मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत केले गेले.

टीम इंडियाची ओपन डेकमधून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी मरिन ड्राईव्हवर तीन लाखाहून अधिक क्रिकेटप्रेमींनी मोठी मोठी गर्दी केली.

टीम इंडियाच्या खेळांडूना पाहतांना चाहत्यांनी विजयाच्या घोषणा देत त्यांचं स्वागत केलं.

भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेली गर्दी पाहून खेळाडूही भारावून गेले होते.

यावेळी कर्णधार रोहित शर्मा, हार्दीक पांड्यांसह सर्वच खेळांडूंच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत होता.
