IND vs PAK : भारताने पाकिस्तानला पुन्हा लायकी दाखवली, नकवींच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार
आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला.

Team India Refuses To Asia Cup 2025 Trophy From Mohsin Naqvi : आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला चितपट करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने पाच गडी आणि दोन चेंडू राखून सहज विजय मिळवला. नवव्यांदा आशिया कपचं जेतेपद पटकावलं. या विजयामुळे भारताने केवळ गतविजेतेपद कायम ठेवलं नाही, तर पाकिस्तानवर सलग तिसरा दणदणीत विजय नोंदवला.
भारतीय संघाचा आक्रमक पवित्रा
साखळी सामन्यापासूनच भारतीय संघाने (Team India) आक्रमक पवित्रा घेतला होता. पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) ‘नो हँडशेक पॉलिसी’ अवलंबून त्यांना खेळाच्या पलीकडंही लायकी दाखवण्यात आली. सामन्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंनी वाद घालणे, आयसीसीकडे तक्रारी करणे (Asia Cup 2025) आणि सामनाधिकारी अँडी पायक्राफ्ट यांना हटवण्याची मागणी करणे यासारखी नाटकं (IND vs PAK) केली, मात्र शेवटी त्यांची सर्व तक्रार वाऱ्यावर गेली. भारताने मैदानात आणि मैदानाबाहेर दोन्ही ठिकाणी पाकिस्तानला झुकवलं.
Raw emotions 🔥
What it means to win for #TeamIndia 🇮🇳
Scoreboard ▶️ https://t.co/0VXKuKPkE2#AsiaCup2025 | #Final pic.twitter.com/3gml0uDqe9
— BCCI (@BCCI) September 28, 2025
संवाद साधण्यास नकार
अंतिम सामन्यातही हेच चित्र पाहायला मिळालं. टॉसपासूनच भारतीय संघाने स्पष्ट संकेत दिले की, कुठेही समझोता नाही. इतकंच काय, समालोचक रवि शास्त्री यांच्याशी पाकिस्तानच्या खेळाडूंनी संवाद साधण्यास नकार देण्याचं नाटक केलं, मात्र त्यातूनही त्यांचीच लाज गेली.
भारत आपल्या भूमिकेवर ठाम
खरा धक्का मात्र बक्षीस समारंभावेळी बसला. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला. सामनावीर, मालिकावीर आणि उपविजेत्या संघांना पुरस्कार देण्याची औपचारिकता पूर्ण झाली, मात्र विजेतेपद देताना भारतीय संघाने नकवींच्या हस्ते ट्रॉफी न घेतल्याने त्यांचा चेहराच पडला. शेवटपर्यंत भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि नकवींना त्यांच्या जागी बसवलं. यासंदर्भात युएई क्रिकेटचे व्हॉईस प्रेसिडेंट यांनी माहिती दिली.
लायकी दाखवली
या संपूर्ण स्पर्धेत भारताने पाकिस्तानला तीनदा पराभूत करून ‘लायकी दाखवली’. शेवटचा डाव ट्रॉफी समारंभावेळी खेळला गेला आणि तोही भारतानेच जिंकला. मैदानात पराभव आणि मंचावर अपमान – अशा दुहेरी पराभवामुळे पाकिस्तानची अवस्था केविलवाणी झाली.