टी 20 विश्वचषकाचं रिपोर्ट कार्ड; ‘या’ संघांवर भारी टीम इंडियाचे ‘वाघ’

टी 20 विश्वचषकाचं रिपोर्ट कार्ड; ‘या’ संघांवर भारी टीम इंडियाचे ‘वाघ’

T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडियाला (T20 World Cup 2024) आतापर्यंत श्रीलंका आणि न्युझीलंड या दोन संघांचा पराभव करता आलेला नाही. मात्र अन्य संघांविरुद्ध भारतीय संघाचा रेकॉर्ड (Team India) चांगला रेकॉर्ड राहिला आहे. टी 20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सात वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने पाकिस्तानला सहा वेळा धूळ चारली आहे. फक्त एकाच सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. आता या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना होणार आहे. यंदाही पाकिस्तानला पराभूत करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

बांगलादेश विरोधात भारतीय संघाचा इतिहास पाहिला तर विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांचे चार सामने झाले आहेत. या चारही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. बांग्लादेशला एकही सामन्यात विजय मिळवता आला नाही.

टी 20 विश्वचषकात भारताने दक्षिण आफ्रिकेचा चार वेळेस पराभव केला आहे. तर दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. टीम इंडिया आताही शानदार खेळ करत आहे. त्यामुळे या स्पर्धेत विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. अफगाणिस्तान विरोधात भारताचा दबदबा कायम आहे. विश्वचषकात दोन्ही संघात एकूण तीन सामने झाले आहेत आणि या सगळ्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

धोनीचा जलवा कायम! टी 20 विश्वचषकात फलंदाजांना धडकी भरवणारे 5 विकेटकीपर

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. यातील तीन सामने भारताने जिंकले आहेत तर दोन सामन्यात कांगारू भारी पडले आहेत. मागील वर्षातील वनडे विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं होतं. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया पासून सतर्क राहावे लागणार आहे.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाची कामगिरी संमिश्र राहिली आहे. टी 20 विश्वचषकात दोन्ही संघ चारवेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी दोन सामने भारताने आणि दोन सामने इंग्लंडने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचे रेकॉर्ड सारखेच आहे. आयर्लंड संघाविरुद्ध भारतीयांची कामगिरी नेहमीच शानदार राहिली आहे. टी 20 विश्वचषकात दोन्ही संघात आतापर्यंत एकच सामना खेळला गेला आहे आणि या सामन्यात भारताने विजय नोंदवला आहे. नामिबिया विरुद्ध सुद्धा कामगिरी चांगली राहिली आहे. दोन्ही संघात एकच सामना झाला आहे आणि हा सामना भारताने जिंकला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी घेतलाय ब्रेक, पहिल्या सामन्यात फक्त 8 खेळाडू; नेमकं कारण काय?

नेदरलँड्सविरुद्धही असेच रेकॉर्ड राहिले आहे. दोन्ही देशांत एकच सामना टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत खेळला गेला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला आहे. स्कॉटलंड आणि भारत यांच्यात टी 20 विश्वचषकात दोन सामने झाले आहेत. यातील एका सामन्यात भारताला विजय मिळाला आहे तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

वेस्ट इंडीज विरुद्ध मात्र भारतीय संघाचं रेकॉर्ड अतिशय खराब राहिलं आहे. टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघात चार सामने झाले आहेत. यातील तीन सामने विंडीज संघाने जिंकले आहेत. झिम्बाब्वे विरुद्ध भारतीय संघाने एक विजय मिळवला आहे. आधी झिम्बाब्वे टीम अतिशय कमकुवत होती. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. हा संघही आता मजबूत दिसत आहे. त्यामुळे टीम इंडियाला सावध राहावे लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज