India Vs Australia: भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप कोण जिंकणार? थलायवाने केली भविष्यवाणी

India Vs Australia: भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप कोण जिंकणार? थलायवाने केली भविष्यवाणी

Rajinikanth on India Vs Australia World Cup Final : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) या विश्वचषकाच्या सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे. 19 नोव्हेंबर 2023 (रविवारी) दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा रंजक असा सामना रंगणार आहे. विश्वचषकाच्या या महायुद्धामध्ये नेमकं कोण जिंकणार याची चाहत्यांना देखील उत्सुकता लागली आहे. (World Cup Final) दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) म्हणजेच चाहत्यांचा लाडका थलायवाने याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.


मुंबई येथील वानखेडेवर रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये न्यूझीलंडचा दारुण पराभव करत भारातने फायनलमध्ये आपली हजेरी लावली आहे. क्रिकेटप्रेमी, राजकीय मंडळींसह अनेक सेलिब्रिटींनी देखील हा सामना बघायला मुंबईतील वानखेडेवर गेले होते.

यावेळी थलायवा म्हणाले आहे की, ‘भारत न्यूझीलंडची मॅच सुरू असताना सुरुवातीला मला अस्वस्थ वाटत होत. परंतु नंतर विकेट पडत राहिल्या तेव्हा मला खूप आनंद होत गेला. त्या दीड तासामध्ये मी खूप घाबरलो होतो. परंतु विश्वचषक आपलाच असणार याची मला गॅरंटी होती. भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल बघण्यासाठी थलायवा खास चैन्नईहून मुंबईमध्ये हजेरी लावली होती.

कंगनाने केले कोहलीचे तोंडभरून कौतुक; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, ‘विराटची पावलं जिथे पडली…’

दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा चा ‘जेलर’ हा सिनेमा गेल्या काही दिवसापासून चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा नेल्सन दिलीपकुमार यांनी सांभाळली आहे. 2023 च्या हिट सिनेमांमध्ये या सिनेमाचा समावेश करण्यात आला आहे. ‘थलायवा 171’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तसेच थलायवा त्यांच्या लेकीच्या ‘लाल सलाम’ सिनेमात देखील हटक्या भूमिकेत झळकणार आहेत. 2024 मध्ये हा सिनेमा चाहत्यांच्या लवकरच भेटीला येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube