कंगनाने केले कोहलीचे तोंडभरून कौतुक; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, ‘विराटची पावलं जिथे पडली…’
Kangana Ranaut Praises Virat Kohli: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ Semi-Final) यांच्यातील झालेला सेमी फायनलचा सामना भारतीयांसाठी खूपच खास ठरला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. आणि विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात आपले 50 वे शतक झळकावले. विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विराट कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. यावर आता अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) देखील खास पोस्ट शेअर करुन कोहलीचे तोंडभरून कौतुक केले आहे.
View this post on Instagram
कंगनाची पोस्ट
कंगनानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट हा शतक झळकावल्यानंतर सचिनला अभिवादन करत असल्याचे बघायला मिळाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कंगनानं कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “किती अप्रतिम!! कोहलीने भविष्यामध्ये त्याचे रेकॉर्ड मोडणाऱ्यानं त्याला कसे अभिवादन करावे, याचे उत्तम उदाहरण दिलं आहे. तो ज्या पृथ्वीवर चालत आहे, त्याला देखील त्यांनी वंदन केलं पाहिजे. आणि तो हे डिजर्व करत असतो.
विराट कोहली याने 50 वे शतक पूर्ण करताच एका अनोख्या स्टाइलने सचिन तेंडुलकरला अभिवादन केले आहे. सचिन तेंडुलकर उपांत्य फेरीचा सामना बघण्याकरिता मैदानात आला होता. विराट कोहलीने त्याच्याकडे पाहत अभिवादन केले आहे. त्यानंतर त्यानं अनुष्काला फ्लाईंग किस देत आपला आनंद साजरा केला आहे. कंगनाने विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक याअगोदर देखील केले होते. कंगनाने विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना ‘पावर कपल’ असं देखील म्हणल्याचे बघायला मिळाले होते.
Murderwale Kulkarni: वैभव अन् संतोषची जोडी जमली, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज
कंगनाचा तेजस हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीस आला आहे. ‘तेजस’ या सिनेमात कंगनासोबत वरुण मित्रा देखील मुख्य भूमिका बजावली आहे. कंगनाच्या ‘चंद्रमुखी 2’ या सिनेमाला देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. कंगना ही लवकरच ‘इमर्जन्सी’ (Emergency) या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगना ही इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगनाच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात.