ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी घेतलाय ब्रेक, पहिल्या सामन्यात फक्त 8 खेळाडू; नेमकं कारण काय?

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी घेतलाय ब्रेक, पहिल्या सामन्यात फक्त 8 खेळाडू; नेमकं कारण काय?

T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषकाचा थरार 2 जूनपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत यंदा प्रथमच 20 संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेत एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट संघ अमेरिकेत दाखल होत आहेत. स्पर्धेतील मुख्य सामने सुरू होण्याआधी सराव सामने खेळवले जाणार आहेत. ऑस्ट्रेलिया संघाचा सराव सामना नामिबियाशी होणार आहे. परंतु, या सामन्याआधीच कांगारू संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडे फक्त आठच खेळाडू उपलब्ध आहेत. त्यामुळे सपोर्ट स्टाफला मैदानात उतरणे भाग पडणार आहे.

संघातील सर्व खेळाडू अजूनही वेस्टइंडिज मध्ये पोहोचलेले नाहीत. याचं मुख्य कारण भारतातील टी 20 प्रीमियर लीग आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघातील काही खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि ट्रविस हेड चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात होते.

T20 World Cup : आयसीसीने केली सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ‘या’ संघाला देणार टक्कर

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने असा निर्णय घेतला आहे की आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना टी 20 वर्ल्डकप आधी काही काळ विश्रांती देण्यात येईल. बंगळुरू संघाकडून खेळणारा कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल आणि लखनऊ संघाचा मार्कस स्टोईनिस अजूनही बार्बाडोसला पोहोचलेले नाहीत. स्टोईनिस सराव सामन्यानंतर येथे येईल. तसेच कॅमरून ग्रीन आणि मॅक्सवेल या आठवड्याच्या अखेरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

मिचेल मार्शने cricket.com.au ला माहिती देताना सांगितले की आमचा संघ पूर्ण असणार नाही परंतु नामिबिया बरोबरील सामना हा फक्त सराव सामना आहे. त्यामुळे ज्या खेळाडूंना खेळायचे असेल ते खेळतील. जे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होते ते सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. आम्हाला असं वाटत होतं की काही काळ विश्रांती घ्यावी आणि नंतर विश्वचषक स्पर्धेत सहभागी व्हावं.

T20 World Cup 2024 मध्ये टीम इंडियासाठी धोका ठरणार ‘हे’ तीन भारतीय खेळाडू

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज