T20 World Cup : आयसीसीने केली सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ‘या’ संघाला देणार टक्कर

T20 World Cup : आयसीसीने केली सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ‘या’ संघाला देणार टक्कर

T20 World Cup 2024 : टी २० विश्वचषक स्पर्धा पुढील महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये (T20 World Cup 2024 ) होणार आहे. या स्पर्धांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील सराव सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने प्रसिद्ध केले आहे. २७ मे ते १ जून दरम्यान सराव सामने होणार आहेत. टीम इंडियाचा पहिला सराव सामना बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. हा सामना अमेरिकेत होईल. या सामन्याची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.

या स्पर्धेत एकूण १६ सराव सामने होतील. १७ संघ सराव सामने खेळणार आहेत. हे सामने अमेरिकेतील टेक्सास, फ्लोरिडा, वेस्टइंडिजमधील त्रिनिदाद अँड टोबॅगो या ठिकाणी होणार आहेत. या सामन्यांना अधिकृत टी २० सामन्यांचा दर्जा नाही. या सामन्यात १५ खेळाडूंना खेळण्याची परवानगी आहे. ३० मे रोजीचा वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चाहत्यांना पाहता येणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले. या सामन्यासाठी तिकीट विक्री सुरू झाली आहे.

T20 विश्वचषकात टीम इंडिया ‘या’ दोन संघांविरुद्ध जिंकलीच नाही; यंदाही आव्हान कायम

सराव सामन्यांचे वेळापत्रक

२७ मे
ओमान वि. पापुआ न्यू गिनी
नामिबिया वि. युगांडा
कॅनडा वि. नेपाळ

२८ मे
ऑस्ट्रेलिया वि. नामिबिया
बांग्लादेश वि. अमेरिका
श्रीलंका वि. नेदरलँड्स

२९ मे
अफगाणिस्तान वि. ओमान
दक्षिण आफ्रिका इंट्रा स्क्वाड सामना

T20 World Cup 2024 सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का, ICC ची ‘ही’ चूक पडू शकते महागात

३० मे
स्कॉटलंड वि. युगांडा
नेदरलँड्स वि. कॅनडा
नेपाळ वि. अमेरिका
नामिबिया वि. पापुआ न्यू गिनी
वेस्ट इंडिज वि. ऑस्ट्रेलिया

३१ मे
आयर्लंड वि. श्रीलंका
स्कॉटलंड वि. अफगाणिस्तान

१ जून
बांग्लादेश वि. भारत

follow us
  • fb
  • instagram
  • youtube