आयसीसीच्या निर्णयाचं टीम इंडियाला टेन्शन; पाकिस्तान सामन्याचं कनेक्शन काय?
IND vs PAK : टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक (T20 World Cup 2024) राहिले आहेत. या स्पर्धेसाठी सर्व तयारी (IND vs PAK) पूर्ण झाली आहे. यंदा अमेरिका आणि वेस्ट इंडीज या दोन देशांत ही स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे प्रथमच २० संघ सहभागी होत आहेत. टीम इंडिया प्रबळ (Team India) दावेदार मानली जात आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला आयर्लंड विरुद्ध होणार आहे. यानंतर ९ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला टक्कर देणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने अंपायर कोण असतील याची घोषणा केली आहे. आता हीच गोष्ट टीम इंडियासाठी कदाचित डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भारत पाकिस्तान सामन्यासाठी आयसीसीने रॉड टकर आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांना अंपायर म्हणून नियुक्त केले आहे. इलींगवर्थ टीम इंडियासाठी अनलकी मानले जातात. इलिंगवर्थ यांनी मोठ्या सामन्यात पंच म्हणून काम केले आहे आणि या सामन्यात भारतीय संघाचा मात्र पराभव झाला आहे. २०१९ मधील वर्ल्डकप सेमी फायनल सामन्यात इलिंगवर्थ अंपायर होते आणि या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला.
T20 विश्वचषकात टीम इंडिया ‘या’ दोन संघांविरुद्ध जिंकलीच नाही; यंदाही आव्हान कायम
यानंतर इलिंगवर्थ WTC 2021 आणि WTC 2023 च्या फायनल सामन्यात अंपायर होते आणि या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. आता इलिंगवर्थ पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अंपायर आहेत. अशा वेळी क्रिकेट चाहत्यांचे टेन्शन थोडे वाढले आहे. शेवटी या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. परंतु या निमित्ताने हा योग मात्र जुळून आला आहे.
दरम्यान, या स्पर्धेत भारतीय संघाचा पाहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड बरोबर होणार आहे. तर दुसरा सामना 9 जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात होणार आहे. टी 20 क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. भारतीय संघाने आतापर्यंत या क्रिकेटमध्ये दमदार खेळ केला आहे पण श्रीलंका आणि न्यूझीलँड या दोन संघांनी भारताला कडवे आव्हान दिले आहे. टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाला या दोन संघांचा अजूनही पराभव करता आलेला नाही. तर दुसरीकडे बांगलादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या संघांना टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला पराभूत करता आलेले नाही.