T20 वर्ल्डकप शेड्यूलमध्ये गडबड; 24 तासांपेक्षा कमी वेळात सेमी फायनल अन् फायनल?

T20 वर्ल्डकप शेड्यूलमध्ये गडबड; 24 तासांपेक्षा कमी वेळात सेमी फायनल अन् फायनल?

T20 World Cup 2024 Schedule : यंदा टी 20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये (T20 World Cup 2024) खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत प्रथमच 20 क्रिकेट संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार पहिला सामना २ जून रोजी होणार आहे. २६ आणि २७ जून रोजी सेमी फायनल होणार आहे तर २९ जून रोजी अंतिम सामना होणार आहे. दुसरा सेमी फायनल सामना आणि अंतिम सामन्यात एक दिवसाचा गॅप म्हणजे २४ तासांपेक्षा कमी वेळात एखाद्या संघाला अंतिम सामना खेळावा लागण्याची शक्यता आहे.

जून महिन्यात कॅरिबियन देशात उन्हाळा असतो. अशा दिवसांत पावसाची शक्यता कमी असते. मात्र तरीही पावसाची शक्यता नाकारता येत नाही. जर अशी शक्यता नसतीच तर आयसीसीने एक दिवस राखीव ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. पाऊस पडला तर दुसरा सेमी फायनल २८ जून रोजी होईल. असे जर घडले तर जिंकणाऱ्या संघाला २४ तासांपेक्षा कमी वेळात अंतिम सामना खेळावा लागू शकतो.

T20 World Cup : आयर्लंड, पापुआ न्यू गिनी संघांची घोषणा; टी 20 वर्ल्डकप तयारी अंतिम टप्प्यात

इतकेच नाही तर त्यांना या काळात गुयानातील प्रोविडेंस पासून बार्बाडोसमधील ब्रिजटाऊन पर्यंतचा प्रवास करावा लागेल. टीम इंडियाच दुसरा सेमी फायनल सामना खेळेल याचीही शक्यता नाकारता येत नाही.

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार अंतिम ४ मध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय संघ २७ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजल्यापासून सेमी फायनलचा सामना खेळावा लागणार आहे. क्रिकेट वेस्टइंडिजच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की स्पर्धेतील नियमांवर आयसीसीचे नियंत्रण आहे त्यामुळे वेस्टइंडिज बोर्ड यावर काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

यानंतर क्रिकबजने आयसीसीशी संपर्क केला. १५ मार्च रोजीच्या निवेदनानुसार या स्पर्धेतील अंतिम तीन सामन्यांसाठी राखीव दिवसाची घोषणा करण्यात आली आहे. जर असेच दृश्य समोर आले तर आयसीसीला फायनलला राखीव दिवस ३० जूनपर्यंत शिफ्ट करावा लागू शकतो. याआधीच्या स्पर्धेत सेमी फायनल आणि फायनल सामन्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्यात आले होते. मागील वर्षात भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सेमी फायनल सामना १६ नोव्हेंबरला तर फायनल सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज