श्रीलंका क्रिकेटला मोठा दिलासा ! आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यावरील बंदी आयसीसीने उठवली

  • Written By: Published:
श्रीलंका क्रिकेटला मोठा दिलासा ! आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यावरील बंदी आयसीसीने उठवली

Cricket Sri Lanka Ban lifted : श्रीलंका क्रिकेट बोर्डासाठी (Sri Lanka Cricket Board) आज आनंदाची बातमी आहे. श्रीलंका क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास लावलेली बंदी अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (ICC) उठविली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या कारभारामध्ये सरकार हस्तक्षेप करत असल्याच्या कारणामुळे ही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तब्बल तीन महिने श्रीलंका संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला नव्हता. आयसीसीने अधिकृतपणे बंदी उठविण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

‘आयाराम, गयाराम’लाही नितीश कुमारांनी मागं टाकलं; शरद पवारांची खोचक टीका

आयसीसीने म्हटले की, श्रीलंका क्रिकेट बोर्ड हे आयसीसीचे सदस्य असताना आपले कर्तव्यांचे गंभीरपणे उल्लंघन करत होते. ते स्वायत्तपणे आपला कारभार करत नव्हते. या कारणामुळे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घालण्यात आली होती. आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड जबाबदारीने आपले काम करत आहे. त्यामुळे त्यांच्यावरील बंदी तत्काळ हटविण्यात येत आहे.

मालदीवच्या संसदेत फुल्ल ऑन राडा : सत्ताधारी अन् विरोधी भिडले, एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण

श्रीलंकेत आर्थिक संकट आले होते. त्याचबरोबर श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी खराब झाली. वर्ल्डकपमध्ये भारताने लंकेचा दारुण पराभव केला होता. लंकेचा संघ भारताविरुद्ध अवघ्या 55 धावांत गारद झाला होता. या सामन्यात लंका तब्बल 302 धावांनी पराभूत झाली होती. त्यामुळे श्रीलंकेचे क्रीडामंत्री अर्जुन रणतुंगाने श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केले होते. तर रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम कमेटी तयार करण्याचा प्रयत्न केला होता.

परंतु श्रीलंका न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. क्रिकेट बोर्डामध्ये सरकारचा हस्तक्षेप झाल्याने आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला आंतरराष्ट्रीय सामने खेळता आले नाहीत. आता मात्र बंदी हटविण्यात आल्याने लंकेचा संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज