ICC Champions Trophy : आधी ‘आशिया कप’ आता ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’; पाकिस्तानचं यजमानपद पुन्हा संकटात

ICC Champions Trophy : आधी ‘आशिया कप’ आता ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’; पाकिस्तानचं यजमानपद पुन्हा संकटात

ICC Champions Trophy : आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानात खेळण्यास भारताने नकार दिल्यानंतर पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपदच गमवावे लागले होते. आताही अशीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. ज्यामुळे 2025 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champions Trophy) यजमानपदही पाकिस्तानकडून हिसकावले जाऊ शकते. या स्पर्धा पाकिस्तानात (Pakistan) होणार आहेत. जर टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला तर पाकिस्तानच्या अडचणी वाढू शकतात. मात्र आधीचा अनुभव असल्याने जर असे झालेच तर आयसीसीकडून (ICC) पैसे वसूल करण्याची तयारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आधीच करून ठेवली आहे.

विश्वचषकाआधी (World Cup 2023) आशिया कप (Asia Cup 2023) खेळला गेला होता. या स्पर्धेच्या आयोजनावरून मोठा गदारोळ झाला होता. पाकिस्तान बोर्डाने भरपूर प्रयत्न केले मात्र भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला. त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषदेने स्पर्धेतील नऊ सामन्यांचे यजमानपद श्रीलंकेला देण्याचा निर्णय घेतला होता. तर पाकिस्तानला फक्त चार सामने आयोजित करण्याची संधी मिळाली. आताही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे.

ICC साठी रोहितचं ‘बेस्ट’ कॅप्टन; दोन ट्रॉफीज् मिळवून देणाऱ्या पॅट कमिन्सला बाहेरचा रस्ता

बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी मागील वर्षीच स्पष्ट केले होते की भारतीय संघ पाकिस्तानात कोणताही सामना खेळणार नाही. त्यानंतर चिडलेल्या पाकिस्तान बोर्डानेही भारतातील विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा धमकी दिली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता पाकिस्तान बोर्डाने म्हटले आहे की जर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला तर आयसीसीकडून नुकसानभरपाई घेतली जाईल. भारत कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात खेळणार नाही असेच सध्याच्या परिस्थितीवरून वाटत आहे. जर असे घडले तर दुबईत ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. आयसीसीने जर हा निर्णय घेतला तर मोठे सामने पाकिस्तानला गमवावे लागतील.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 मध्ये होणार आहे. अजून एक वर्षाचा कालावधी आहे. या स्पर्धेची तयारी पाकिस्तानने सुरू केली आहे. जर भारताने नकार दिला तर या स्पर्धेतील काही सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करावे लागतील. या स्पर्धेसाठी भारत आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ICC Ranking: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दमदार खेळीचा कोहली-राहुलला फायदा, पाहा नवीन क्रमवारी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube