Breaking News : श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आयसीसीचा दणका ! बोर्डाचे सदस्यत्वच रद्द

  • Written By: Published:
Breaking News : श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आयसीसीचा दणका ! बोर्डाचे सदस्यत्वच रद्द

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) निराशाजनक कामगिरी करणाऱ्या श्रीलंकेला आणखी एक धक्का बसला आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंकेचे सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयसीसीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे श्रीलंका संघाला आता आयसीसीच्या कुठल्याही स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आयसीसीने ठेवला आहे. बोर्डाच्या कामकाजात सरकारचा हस्तक्षेप झाल्याने आयसीसीने श्रीलंका बोर्डाचे सदस्यत्वच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेची कामगिरी अंत्यत खराब झाली. तर भारताविरुद्धच्या सामन्यात लंकेचा दारुण पराभव झाला. त्यानंतर श्रीलंकेच्या संसदेने क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यासाठी एक प्रस्ताव आणला होता. त्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी समर्थन दिले होते.

World Cup 2023 : जुन्या आठवणी पुन्हा ताज्या; यंदाही सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड भिडणार!

विरोधी पक्षाचे नेते साजिथ प्रेमदासा यांनी भ्रष्ट श्रीलंका क्रिकेट व्यवस्थापनाला हटविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला सरकारमधील मंत्री निमल सिरिपाला डिसिल्वा यांनी पूर्णपणे समर्थन दिले होते. तर दोन दिवसांपूर्वी शमी सिल्वा यांच्या अध्यक्षतेखालील श्रीलंका क्रिकेट बोर्डाला न्यायालयाने दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता. हे बोर्ड कायम ठेवण्याचा निर्णय न्यायालयाचा होता. त्यानंतरही सरकारने क्रिकेट बोर्डाला बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

World Cup 2023 : भारताचा सलग आठवा ‘विराट’ विजय, दक्षिण आफ्रिकेचा 83 धावांत खुर्दा !

हा निर्णय आयसीसीला आवडला नाही. त्यामुळे आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व रद्द केले आहे. सरकारच्या हस्तक्षेपामुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका आता श्रीलंकेला बसणार आहे. कारण श्रीलंकेचा क्रिकेट संघाला आता आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही. विशेष म्हणजे 2025 मध्ये श्रीलंका आयसीसी चॅम्पियनशीप ट्ऱॉफीचा आयोजक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube