India vs Sri Lanka Final Asia Cup 2023 : सिराजसमोर श्रीलंकेनं गुडघे टेकले, 50 धावांमध्येच गारद…

India vs Sri Lanka Final Asia Cup 2023 : सिराजसमोर श्रीलंकेनं गुडघे टेकले, 50 धावांमध्येच गारद…

India vs Sri Lanka Final Asia Cup 2023 : आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु होताच श्रीलंकेच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक गळती लागल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या 50 धावांमध्ये श्रीलंकेचा सर्वच्या सर्व संघ तंबूत परतला आहे. मोहम्मद सिराजने सहा तर हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या आहेत.

IND vs SL Asia Cup Final: मोहम्मद सिराजकडून लंकाहरण ! एक षटकात चार बळी

आशिया कपचा शेवटचा सामना आज खेळवला जात आहे. भारत आणि श्रीलंकेचे संघ अंतिम सामन्यात आमनेसामने खेळत आहेत. विजेतेपदासाठी श्रीलंकेने भारतासमोर 50 धावांचे आव्हान ठेवले आहे. आज सुरु असलेल्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घतेला. मात्र हा अंतिम सामना एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय कसं मिळालं?; बच्चू कडूंनी गुवाहाटीतला ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला

भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने 6 विकेट घेतल्या आणि हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेची संपूर्ण टीम 50 धावांमध्येच तंबूत पाठवली आहे.

श्रीलंकेचा संपूर्ण संघ 50 धावांवर बाद झाला. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची आजची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये भारतीय टीमने श्रीलंकन टीमला 22 षटकांमध्ये 73 रणांमध्येच गुंडाळले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube