‘आयाराम, गयाराम’लाही नितीश कुमारांनी मागं टाकलं; शरद पवारांची खोचक टीका

  • Written By: Published:
‘आयाराम, गयाराम’लाही नितीश कुमारांनी मागं टाकलं; शरद पवारांची खोचक टीका

Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमा हे इंडिया आघाडी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज ते इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा भाजपसोबत (BJP) नवं सरकार स्थापन केलं. त्यांनी ९ व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. इंडिया आघाडीतील अनेकांनी नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र डागलं. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनीही  जोरदार टीका केली. आयाराम, गयारामला देखील नितीश कुमारांनी मागं टाकल्याचा टोला त्यांनी लगावला.

ओबीसींच्या तोंडचा घास सरकारने पळवला, मराठा आरक्षणाचा मुसदा रद्द करा; भुजबळांची सरकारकडे मोठी मागणी 

आज माध्यमांशी बोलतांना शरद पवारांना नितीश कुमार यांच्या निर्णयाविषयी विचारले असता ते म्हणाले की, आजवर एकाच टर्ममध्ये दोनदा वेगवेगळ्या पक्षांसोबत युती करण्याचा विक्रम आजवर कोणीही केला नव्हता, तो नितीश कुमार यांनी केला. नितीश कुमार यांनी भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली होती. त्यानंतर भाजप सोडल्यानंतर त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत सरकार स्थापन केले. यानंतर त्यांनी पुन्हा लालू प्रसाद यादव यांची साथ सोडली आणि भाजपसोबत युती केली. मला वाटतं, अशी परिस्थिती यापूर्वी कधीच पाहायला मिळाला नाही. यापूर्वी हरियाणाचे उदाहरण दिले जायचं. तिथे ‘आयाराम, गयाराम’ ही संज्ञा वापरली गेली. पण हरियाणाच्या ‘आयाराम, गयाराम’ला देखील नितीश कुमारांनी मागं टाकल्याचा टोला पवारांनी लगावला.

राहुल गांधींचा डुप्लिकेट? आसामचे मुख्यमंत्री आता नाव व पत्ताच उघड करणार 

तर अखिलेश यादव म्हणाले की, भाजपने भावी पंतप्रधानांना कट रचून मुख्यमंत्रीपदार रोखले. भाजपने बिहारच्या जनतेचा आणि जनमताचाही अपमान केला आहे. या अपमानाला जनता लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून प्रत्युत्तर देईल. बिहारमधील प्रत्येक नागरिक बिहारची इज्जत वाचण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी मतदान करेलं, असं ते म्हणाले

ठाकरे गटाचे नेते नेते संजय राऊत यांनी ‘अयोध्येत राम आणि बिहारमध्ये पलटूराम’ म्हणत नितीश यांच्यावर हल्लाबोल केला. नितीश कुमार मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. इंडिया आघाडीची स्थिती चांगली आहे. ममता बॅनर्जी अजून बाहेर गेल्या नाहीत. आम आदमी पक्षही वेगळा झालेला नाही. काँग्रेस, तेजस्वी यादव आणि इतर छोटे पक्ष आमच्यासोबत आहेत. नितीश कुमार आपल्यापासून दूर गेल्याने बिहारच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही, असं राऊत म्हणाले.

आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, नितीश कुमार हे थकलेले मुख्यमंत्री आहेत, आम्ही त्यांच्याकडून कामे करून घेतली. हा खेळ अजून संपला नाही. जेडीयू 2024 मध्ये संपेल, असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज