Nitish Kumar : आता आम्ही कायमस्वरुपी.. CM बनल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया

Nitish Kumar : आता आम्ही कायमस्वरुपी.. CM बनल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया

Nitish Kumar : राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार नवव्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर (Bihar Politics) विराजमान झाले आहेत. यावेळेस त्यांच्या सोबतीला भाजप आहे. नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपाचे विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनीही मंत्रिपदाची (Bihar News) शपथ घेतली. या शपथविधीनंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली.

नितीश कुमार म्हणाले, मी सुरुवातीपासूनच भाजपबरोबर होतो. मध्यंतरी आम्ही मार्ग बदलले होते. मात्र आता पुन्हा एकदा एकत्र आलो असून कायमस्वरुपी बरोबर राहणार आहोत. माझ्यासह आठ जणांनी शपथ घेतली आहे. ज्यांची शपथ राहिली आहे त्यांचाही शपथविधी लवकरच होईल. सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा या दोघांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. बिहारच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत भविष्यातही अशाच पद्धतीने काम करत राहू.

Bihar Cast Survey : फक्त 7 टक्के ‘ग्रॅज्यूएट’, 25 टक्के सवर्ण गरीब’ बिहारची आकडेवारी धक्कादायक

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वातील सरकार राज्यातील नागरिकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न करील. यानंतर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या भाजपाच्या मंत्र्यांनाही शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की बिहारमध्ये स्थापन झालेले एनडीए सरकार राज्याच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न करील. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल सम्राट चौधरी आणि विजय सिन्हाजी यांचे हार्दिक अभिनंदन. मला विश्वास आहे की ही टीम राज्यातील माझ्या कुटुंबियांची पूर्ण समर्पण भावाने सेवा करील.

Nitish Kumar : नितीश कुमारांनी राजीनामा का दिला? स्वतःच केला धक्कादायक खुलासा

मागील तीन दिवसांपासून चर्चेत असलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज सकाळीच बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आज (28 जानेवारी) संयुक्त जनता दलाच्या (JDU) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. तसेच यावेळी आपण भाजपसोबत (BJP) का जात आहोत, याबाबतची भूमिका आमदारांना समजावून सांगितली होती. त्यानंतर त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. तसेच भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावाही केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज