Nitish Kumar : नितीश कुमारांनी राजीनामा का दिला? स्वतःच केला धक्कादायक खुलासा

Nitish Kumar : नितीश कुमारांनी राजीनामा का दिला? स्वतःच केला धक्कादायक खुलासा

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी (Nitish Kumar) आज अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. इंडिया आघाडी (INDIA Alliance) आणि लालू प्रसाद यादव यांच्या (Lalu Yadav) आरजेडीसाठी हा मोठा (RJD) धक्का आहे. नितीश कुमार यांनी आज राजीनामा राज्याच्या राज्यपालांकडे सुपूर्द केला. आम्ही ज्या पक्षासोबत याआधी सरकार स्थापन केले त्यांची इच्छा असेलत तर आजच नवीन सरकारचा (Bihar Politics) शपथविधी होईल. या घडामोडीनंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील महाआघाडीशी संबंध का तोडले याचा खुलासा केला

नितीश कुमार म्हणाले, आघाडीत काहीही चांगले घडत नव्हते. आम्ही इंडिया (Bihar News) आघाडीत काम करत होतो. सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होतो परंतु बाकीचे पक्ष काम करत नव्हते. आघाडीची परिस्थितीही चांगली नव्हती. त्यामुळे मला राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागला.

अखेर नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा होणार शपथविधी

आज मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आम्ही सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. कारण सरकार व्यवस्थित चालत नव्हते. आमचा घटक पक्षांशी संवाद देखील बंद झाला होता. यानंतर आम्ही सर्वांची मते जाणून घेतली. त्यानंतर या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही नव्या युतीची घोषणा केली आहे. दीड वर्षांपू्र्वी आघाडी केली होती. परंतु, परिस्थिती चांगली नव्हती. म्हणून राजीनामा द्यावा लागला. आता जे पक्ष आधी एकत्र होते त्यांनी आजच निर्णय घेतला तर आजच नवीन सरकार स्थापन होऊ शकते.

काँग्रेसचा हल्लाबोल

नितीश कुमार यांच्या काँग्रेसने जोरदार टीका केली. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी नितीश कुमार यांना रंग बदलणाऱ्या सरड्याची उपमा दिली. वारंवार भागीदार बदलणारे नितीश कुमार रंग बदलण्यात सरड्यांनाही टक्कर देत आहेत. हा विश्वासघात करणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या इशाऱ्यांवर नाचणाऱ्यांना बिहारची जनता कधीच माफ करणार नाही, असे रमेश (Jairam Ramesh) म्हणाले. दरम्यान, नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महागठबंधनचे सरकार आता कोसळले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना देखील राजीनामा द्यावा लागाणार आहे.

INDIA आघाडीला बिहार अन् महाराष्ट्रात होत्या मोठ्या अपेक्षा.. भाजपने दोन्हीकडचे राजकारण सेट केले!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज