INDIA आघाडीला बिहार अन् महाराष्ट्रात होत्या मोठ्या अपेक्षा… भाजपने दोन्हीकडचे राजकारण सेट केले!
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सत्ताधारी भाजपला (BJP) सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पण निवडणुकीपूर्वीच या आघाडीतील एक एक पक्ष बाजूला होताना दिसत आहेत. आम आदमी पक्ष (AAP) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) यांनी आघाडीतून बाजूला होण्याचा निर्णय घेण्यास 24 तास होत नाहीत तेच नितीश कुमार (Nitish Kumar) तिसरा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारुन भाजपसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 28 जानेवारीला त्यांचा भाजपच्या पाठिंब्यावर शपथविधी होण्याची शक्यता आहे.
इंडिया आघाडीला नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. कारण बिहार आणि महाराष्ट्र या दोन राज्यांकडून या आघाडीला सर्वात जास्त अपेक्षा होत्या. कारण या दोनच राज्यांमध्ये भाजपला जास्त जागा असूनही विरोधकांच्या आघाडीमुळे सत्तेबाहेर बसावे लागले होते. या राज्यांमध्ये या आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या राज्यांचा फॉर्म्युला देशातील इतर राज्ये आणि केंद्रातही चालला असता तर याचा भाजपला मोठा फटका बसला असता. म्हणूनच ही एकी टिकवून ठेवणे विरोधी पक्षांसाठी गरजेचे होते, तर फोडणे भाजपसाठी महत्वाचे होते. पण या लढाईत दोन्ही राज्यांमध्ये भाजपलाच यश आल्याचे दिसून येत आहे.
नितीश कुमारांचं ठरलं! RJD ला धक्का देत ‘या’ दिवशी JDU-BJP सरकारचा शपथविधी ?
आता महाराष्ट्रापाठोपाठ बिहारमध्येही भाजप सत्तेत येताना दिसत आहे. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच निवडणूक लढविली होती. मात्र त्यांनी निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले होते. निवडणुका जिंकूनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले होते. मात्र, नंतर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड घडवून आणत पुन्हा सरकार स्थापन केले. आता उद्धव ठाकरे यांच्या हातात ना सत्ता उरली ना पक्ष उरला. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला आहे.
लालू यादवांचा मोठा डाव : सत्ता कायम ठेवण्यासाठी थेट भाजपच्या मित्रपक्षालाच उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर
28 जानेवारीला शपथविधी?
सध्या देशाच्या राजकारणाचे लक्ष बिहारकडे लागले (Bihar Politics) आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 28 जानेवारी रोजी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी होईल अशा चर्चा माध्यमांतून सुरू झाल्या आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.