Nitish Kumar : काँग्रेसची गुगली अन् ममतांचा डाव! संयोजकानंतर PM पदाच्या शर्यतीतूनही नीतीशकुमार OUT

Nitish Kumar : काँग्रेसची गुगली अन् ममतांचा डाव! संयोजकानंतर PM पदाच्या शर्यतीतूनही नीतीशकुमार OUT

Nitish Kumar : इंडिया आघाडीची चौथी बैठक राजधानी (INDIA Alliance) दिल्लीत पार पडली. 2024 मध्ये पीएम मोदींसमोर कोण असा मोठा प्रश्न या बैठकीत होता. सगळ्यांचा नजरा राहुल गांधी आणि नीतीशकुमार (Nitish Kumar) यांच्याकडे होत्या. पण, ममता बॅनर्जी यांनी टायमिंग साधत मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पुढं केलं. त्यांच्या या राजकीय डावाने सारेच आश्चर्यचकीत झाले. विशेष म्हणज खर्गे यांच्या नावाला आम आदमी पार्टीनेही समर्थन दिल्याची चर्चा आहे. आता ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांचा हा प्रस्ताव म्हणजे नीतीशकुमार यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. पहिला झटका बंगळुरुतील बैठकीत बसलाच होता. त्यावेळी नीतीशकुमार यांच्या संयोजक बनण्यावर घटक पक्षांत सहमती झाली नव्हती.  आघाडीच्या राजकारणात संयोजकपद खूप महत्वाचं मानलं जातं. 1989 मध्ये राष्ट्रीय मोर्चाचे संयोजक राहिलेले वीपी सिंह सरकार आल्यानंतर थेट पंतप्रधान झाले होते.

18 डिसेंबर रोजी ममतांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की 2024 च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान पदाबाबत निर्णय घेऊ. त्यानंतर 19 डिसेंबरच्या बैठकीत मात्र त्यांनी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. आता ममतांच्या या बदलेल्या राजकीय भूमिकेची जेडीयूत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एप्रिल 2023 मध्ये ममता बॅनर्जी यांनी सांगितल्यानंतरच नीतीशकुमारांनी आघाडीतील घटकपक्षांना पाटण्यात एकत्र आणलं होतं. आता राहुल गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या एका भेटीची चर्चा होत आहे. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी बंगालमध्ये निवडणुका कशा लढवाव्यात यावर चर्चा केली होती. आता नीतीशकुमार संयोजकपदाच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाले आहेत. मात्र अजून त्यांनी स्पष्टपणे काही सांगितलेलं नाही. आता खर्गेंचं नाव समोर आल्याने भविष्यात नीतीश पीएम होतील ही शक्यताही मावळली आहे.

INDIA Alliancne : भाजप विजयाचे ‘इंडिया’ला धक्के! उद्याच्या बैठकीकडे नितीशकुमारांची पाठ

इंडियाचा नेता नीतीशकुमार का नाहीत ?

काँग्रेस नीतीशकुमार यांना पुढं करून दक्षिण आणि मध्य भारतात लढाई कमकुवत करण्याच्या मूडमध्ये नाही. नीतीश जर पीएमपदाचे दावेदार झाले तर बंगाल, केरळ आणि महाराष्ट्रात इंडियातील घटक पक्षांचे नुकसान होऊ शकते. नीतीश यांचं राजकारण असं राहिलं आहे की जर त्यांचं नाव पुढं केलं गेलं तर मुस्लिम व्होटबँक तिसऱ्या आघाडीकडे वळण्याची शक्यता आहे.

निवडणुकआधी कोणत्या एका चेहऱ्याला पुढे केले गेले त निवडणूक फक्त त्याच्याच भोवती फिरेल. आताच्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. अशा परिस्थितीत नीतीश यांचं नाव पुढं करणं काँग्रेसला परवडणार नाही. इंडियातील बहुतांश घटक पक्षांना काँग्रेसबरोबर जागावाटप करायचे आहे. अशा परिस्थितीत हे पक्ष नीतीशकुमार यांचं समर्थन करतील याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे नीतीशकुमार यांच्यासाठी पुढं येण्याची या पक्षांची तयारी दिसत नाही.

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, इंडिया आघाडीच्या बैठकीत नीतीशकुमार नाराज दिसले. डीएमकेचे खासदार टीआर बालू यांनी ज्यावेळी नीतीशकुमार यांनी दिलेल्या भाषणाचा अनुवाद मागितला त्यावेळी नीतीशकुमार संतापले होते. नीतीश यांनी आपल्या भाषणात कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचंही सांगितलं. बैठक संपल्यानंतर नीतीशकुमार लगेचच पाटण्याला रवाना झाले.

Bihar Cast Survey : फक्त 7 टक्के ग्रॅज्यूएट 25 टक्के सवर्ण गरीब; बिहारची आकडेवारी धक्कादायक

नीतीश कुमार नाराज का आहेत ?

जेडीयू सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीतीशकुमार नाराज असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे काँग्रेसचं उदासीन धोरण. नीतीशकुमार काँग्रेसला गंभीर सहकाऱ्याच्या रुपात पाहत नाहीत. नीतीश कुमार यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की सप्टेंबर 2022 मध्येच यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र 15 महिने उलटून गेल्यानंतरही आघाडीचा काहीच प्रभाव अजून तरी दिसलेला नाही. या सर्वांसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे नीतीश कुमार यांचं म्हणणं आहे.

जेडीयूचे वरिष्ठ नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की काँग्रेस आता विश्वासघातीपणा करत आहे. मार्च 2023 मध्ये झालेल्या बैठकीत नीतीशकुमार यांना संयोजक करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र आघाडी स्थापन झाल्यानंतर काँग्रेसने मौन धारण केले.

दुसरं मोठं कारण म्हणजे, लालू यादव यांचा राजकीय दबाव. लालू यादव यांची इच्छा आहे की नीतीशकुमार यांनी बिहारचं राजकारण सोडून दिल्लीच्या राजकारणात जावं. आता एका वाटाघाटीची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. त्यात असं ठरलं होतं की नीतीशकुमार यांनी दिल्लीच्या राजकारणात जावं आणि बिहारच्य मु्ख्यमंत्रिपदाची खुर्ची तेजस्वी यादव यांच्यासाठी सोडावी. यावर कुणीही बोलण्यास सध्या तयार नाही.

काँग्रेस आणि डीएमके नेत्यांच्या बेताल वक्तव्यांवरही नीतीश नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. जेडीयूतील सूत्रांचं असं म्हणणं आहे की सध्या जी वक्तव्ये या नेत्यांकडून दिली जात आहेत असंच जर चालू राहिलं तर भाजप निवडणुका सहज जिंकेल. नीतीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं होतं की बीजेपीच्या जाळ्यात फसू नका.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube