लालू यादवांचा मोठा डाव : सत्ता कायम ठेवण्यासाठी थेट भाजपच्या मित्रपक्षालाच उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर
सध्या देशाच्या राजकारणाचे लक्ष बिहारकडे लागले (Bihar Politics) आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 28 जानेवारी रोजी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी होईल अशा चर्चा माध्यमांतून सुरू झाल्या आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Lalu Prasad Yadav has offered the post of Deputy Chief Minister to Ham Party leader Santosh Manjhi.)
मात्र हा धक्का बाजूला सारत लालू प्रसाद यादव सत्ता कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यादव यांनी बहुमताची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली असून त्यांनी हिंदुस्तानी अवाम मोर्चाशी संपर्क साधला आहे. त्यांनी या पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा मुलगा संतोष मांझी यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. शिवाय महगठबंधनमध्ये आल्यानंतर लोकसभेच्या जागाही देण्याची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती आहे.
Haridwar : ‘कॅन्सर’ग्रस्त मुलाला बुडवून मारल्याचा आरोप; पण पोलिसांनी सांगितले वेगळेच सत्य
243 सदस्यसंख्या असलेल्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा 122 आहे. नितीशकुमार यांनी फारकत घेतल्यास लालू प्रसाद यादव यांच्या राजदला बहुमतासाठी आठ आमदार कमी पडत आहेत. सध्या विधानसभेत राजदचे 79, काँग्रेसचे 19 आणि डाव्या पक्षांचे 16 आमदार आहेत. या सर्वांचे मिळून 114 आमदार होतात. पण बहुमतासाठी लालू प्रसाद यादव यांना आणखी आठ आमदारांची गरज भासत आहे. त्यामुळेच त्यांनी हम पक्षाशी संपर्क केला असल्याचे सांगितले जात आहे.
नितीश कुमारांचं ठरलं! RJD ला धक्का देत ‘या’ दिवशी JDU-BJP सरकारचा शपथविधी ?
जीतनराम मांझी यांनी लालूप्रसाद यांची ऑफर नाकारली
दरम्यान, लालू प्रसाद यांनी संतोष मांझी यांना ऑफर दिली ही निव्वळ अफवा असल्याचे जीतनराम मांझी यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय त्यांनी आपण महागठबंधनसोबत जाणार नसल्याचे सांगितले आहे. मांझी यांच्या ‘हम’ पक्षाचे चार आमदार आहेत. दुसरीकडे भाजपचे 78 आमदार आहेत. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत गेले तर त्यांचे 43 आणि एका अपक्ष आमदारासह एकूण 122 आमदार होत आहेत. मात्र, नितीशकुमार यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) पुनरागमन करण्याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.