अखेर नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा होणार शपथविधी

Budget 2025 Big Benifit For Bihar

पाटना : मागील तीन दिवसांपासून चर्चेत असलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज (28 जानेवारी) संयुक्त जनता दलाच्या (JDU) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच यावेळी आपण भाजपसोबत (BJP) का जात आहोत, याबाबतची भूमिका आमदारांना समजावून सांगितली. त्यानंतर आता ते राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सादर करणार आहेत. तसेच भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावाही करणार आहेत. (Bihar Chief Minister Nitish Kumar has announced his resignation)

लालू-तेजस्वींवर दुहेरी संकट, ईडीकडून पुन्हा समन्स, 9 फेब्रुवारीला हजर राहण्याचे निर्देश

राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत ताणलेले संबंध, इंडिया आघाडीत होत असलेले दुर्लक्ष, जागा वाटपाला काँग्रेस घेत असलेला वेळ, इंडिया आघाडीचे शिल्पकार पण पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा नाही, अशा विविध कारणांनी नितीश कुमार नाराज झाल्याचे बोलले गेले होते. त्यानंतर मागील तीन दिवसांपासून नितीश कुमार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते बिहारमध्ये दाखल झाले होते. भाजपचे बिहारचे प्रभारी विनोद तावडेही पाटन्यामध्ये तळ ठोकून होते.

अखेर INDIA आघाडीचे घोडे गंगेत न्हाले; उत्तर-प्रदेशमध्ये सपा-काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला!

संयुक्त जनता दलाने काल आणि आजही विधानपरिषद आणि विधानसभेच्या सर्व आमदारांची, लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. याच या बैठकीत नितीशकुमार राजीनाम्याबाबत औपचारिक घोषणा केली. तसेच यावेळी आपण भाजपसोबत (BJP) का जात आहोत, याबाबतची भूमिका आमदारांना समजावून सांगिलती. त्यानंतर आता ते राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सादर करणार आहेत. तसेच भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावाही करणार आहेत. दुपारी चार वाजता पुन्हा एकदा त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्यासह संयुक्त जनता दल, भाजप, हम आणि लोक जनशक्ती पक्षाचे सहा ते आठ आमदार मंत्री शपथ घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

follow us