लालू-तेजस्वींवर दुहेरी संकट, ईडीकडून पुन्हा समन्स, 9 फेब्रुवारीला हजर राहण्याचे निर्देश

  • Written By: Published:
लालू-तेजस्वींवर दुहेरी संकट, ईडीकडून पुन्हा समन्स, 9 फेब्रुवारीला हजर राहण्याचे निर्देश

Land For Job Case : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यामुळं राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांचं DCM पद धोक्यात आले. अशातच आता ईडीने (ED) नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात (Land For Job Case) दाखल केलेल्या आरोपपत्राची दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने (Rouse Avenue Courts)दखल घेतली. न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी, तसेच मिसा भारती, हेमा यादव, हृदयानंद चौधरी यांना समन्स पाठवले आहेत. मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर हे समन्स बजावण्यात आले आहे.

‘ग्रामीण भागात कार्यरत असणार डाकसेवकांचे मोलाचे योगदान’ 

काहीच दिवसांपूर्वी ईडीने तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. ईडीने लॅंड फॉर जॉब प्रकरणी हे समन्स पाठवले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने सर्व आरोपींना 9 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ई़डीने तब्बल 4751 पानी आरोपपत्र दाखल केलं होतं. Land For Job प्रकरणात ईडीचे हे पहिले आरोपपत्र आहे. या प्रकणात ईडीने सात जणांना दोषी ठरवलं होतं. त्यात राबडी दवी, मिसा भारती, हेमा यादव, हृदयानंद चौधरी, अमित कात्याल आणि दोन कंपन्यांचा समावेश आहे.

ऑल सेट! नितीश कुमार यांच्या निवासस्थानातील बैठक संपली, उद्या तीन वाजता शपथविधी?

याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 18 जानेवारी रोजी निर्णय राखून ठेवला होता. यानंतर 20 जानेवारीला निर्णय येणार होता, मात्र त्या दिवशी निर्णय झाला नाही.

नेमका घोटाळा काय?
जमीनीच्या बदल्यात नोकरी देण्याचं हे प्रकरण 2004 ते 2009 दरम्यान रेल्वे मंत्री असताना लालू प्रसाद यांच्या कथित ‘ग्रुप-डी’ नोकरीशी संबंधित आहे. 2004-2009 दरम्यान मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर येथे काही व्यक्तींना ग्रुप-डी पदांवर नियुक्त करण्यात आले होते आणि त्या बदल्यात जमीनी घेण्यात आल्याचा आरोप याद कुटुंबावर आहे.

ED ने कोर्टात काय सांगितलं?
सुनावणीदरम्यान ईडीने सांगितले की, आरोपी अमित कात्यालने 2006-07 मध्ये एके इन्फोसिस्टम नावाची कंपनी स्थापन केली होती. कंपनी आयटीशी संबंधित होती. कंपनीने प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय केला नसून अनेक भूखंड खरेदी केल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले होते. यातील एक भूखंड नोकरीसाठी जमीन या घोटाळ्यातून संपादित संपादित करण्यात आला होता.

हीच कंपनी 2014 ला राबडी देवी आणि तेजस्वी यांच्या नावावर एक लाख रुपयांना केली गेली. निर्यात व्यवसाय करण्यासाठी 1996 मध्ये एबी एक्सपोर्ट कंपनीची स्थापना करण्यात आली. 2007 मध्ये, एबी एक्सपोर्ट्सने पाच कंपन्यांकडून 5 कोटी रुपये उभारल्यानंतर न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये एक मालमत्ता खरेदी केली. या प्रकरणी फक्त अमित कात्याललाच अटक करण्यात आल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube