निवडणुकीच्या तोंडावर लालूप्रसाद यादवांच्या डोक्यावर नवं भूत ! आयआरसीटीसी हॉटेलप्रकरण काय आहे ?

IRCTC Scam: 2004 ते 2009 या कालावधीत लालूप्रसाद हे रेल्वेमंत्री होते. आता या प्रकरणात चौदा लोकांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

  • Written By: Published:
Lalu Yadav, Tejashwi Yadav Charged In Alleged IRCTC Hotel Scam

IRCTC Scam:बिहार विधानसभा निवडणुकीचा (Bihar Election 2025) रणसंग्राम सुरू झालाय. एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यात आता निवडणुकीत माजी रेल्वे मंत्री व आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे कुटुंब कायद्याच्या कचाट्यात सापडलंय. रेल्वेच्या आयआरसीटीचा कंत्राट बेकायदेशीरपणे एका हॉटेलला दिल्याचा आरोप लालू प्रसाद यादव व त्यांच्या कुटुंबावर आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालूप्रसाद हे रेल्वेमंत्री होते. आता या प्रकरणात चौदा लोकांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे बिहार निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबासमोर अडचणी उभ्या ठाकल्यात.

महाराष्ट्रात आढळला ‘या’ भयंकर आजाराचा रुग्ण; आरोग्य यंत्रणा झाली सतर्क

हे प्रकरण आयआरसीटीसी (IRCTC) चे प्रकरण रांची आणि पुरी येथील आहे. या ठिकामच्या दोन हॉटेलचा ठेका देताना भ्रष्टाचाराचा झाल्याचा आरोप झाला होता. यात सीबीआयकडून चौकशी झाली. त्यात सुजाता हॉटेल्स प्राइव्हेट लिमिटेड आणि एका खासगी कंपनीला बेकायदेशीरपणे कंत्राट दिले गेले होते. सुजाता हॉटेलसा ठेका देण्यासाठी टेंडरमध्ये गडबड करण्यात आली आहे. त्या बदल्यात लालू प्रसाद यादव यांच्याशी निगडीत एका बेनामी कंपनीला कमी किंमतीत जमीन दिली होती. (Lalu Yadav, Tejashwi Yadav Charged In Alleged IRCTC Hotel Scam)

अजित पवारांच्या नोटीसनंतरही जगतापांच्या सभा! संगमनेरमधील मोर्चामध्ये भगवी टोपी टाळत मवाळ भूमिका


94 कोटी रुपयांची जमिन अवघ्या 65 लाखांना

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार रांचीमधील रेडिसन हॉटेलच्या प्रोजेक्टसाठी (आयआरसीटीसी)ने रेल्वेची जमीन स्वस्तात दिली. त्या जमिनीची सरकारी किंमत 32 कोटी रुपये होती. तर बाजारभाव 94 कोटी रुपये होता. परंतु ही जमीन अवघ्या 65 लाख रुपयांमध्ये हस्तांतरीत केली. रेल्वेच्या ठेकेच्या बदल्यात जमीन घेतली जात होती. त्याला जमिनीच्या बदल्यात नोकरीचे मॉडल म्हटले जात होते.


दिल्ली एव्हेन्यू कोर्टात आरोप निश्चित

यात लालूप्रसाद यादव यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. तर माजी मुख्यमंत्री राबडी देवी व तेजस्वी यादव यांचा सहभाग असल्याने त्यांनाही आरोप करण्यात आलाय. तर माजी केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता यांची पत्नी सुजाता या हॉटेलच्या मालक आहेत. त्यात चार रेल्वेचे अधिकारी आणि सुजाता हॉटेल्सचे डायरेक्टर अशा चौदा जणांविरुद्ध आरोपपत्र निश्चित करण्यात आले आहे.

follow us