कामावर परतली रश्मिका मंदाना, ‘मैसा’च्या सेटवरून इंस्टाग्रामवर दिला मोठा अपडेट

Rashmika Mandanna-मोठ्या पडद्यावर 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी ‘मैसा’ची तयारी जोरात सुरू आहे.

  • Written By: Published:
Rashmika Mandanna

Rashmika Mandanna: लग्नानंतर अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) पुन्हा एकदा कामावर परतली आहे. 2026 मधील चर्चेत असलेल्या ‘मैसा’ (Mysaa) या चित्रपटाच्या शूटिंगला तिने पुन्हा सुरुवात केली आहे. ‘अनफॉर्मूला फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार होत असलेला हा चित्रपट रश्मिकाच्या करिअरमधील एक मोठा प्रोजेक्ट मानला जात आहे.

मोठ्या पडद्यावर 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी ‘मैसा’ची तयारी जोरात सुरू आहे. या चित्रपटात रश्मिका एका अत्यंत शक्तिशाली आणि उग्र भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आधीच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळा अवतार यात पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

लग्न आणि त्यानंतरच्या सर्व समारंभांनंतर रश्मिका आता अधिकृतपणे चित्रपटाच्या सेटवर परतली आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर दिग्दर्शक Ravindra Pulle यांच्या स्टोरीला रिपोस्ट करत शूटिंगची एक झलक शेअर केली. या व्हिज्युअलमध्ये संपूर्ण टीम मोठ्या आणि मोकळ्या लोकेशनवर शूटिंग करताना दिसत आहे. यावरून चित्रपटाची कथा गंभीर आणि थरारक असणार असल्याचा अंदाज येतो.

या पोस्टसोबत “The Hunt Begins” असा रोचक कॅप्शन देण्यात आला आहे. अलीकडेच मेकर्सनी ‘मैसा’ची पहिली झलकही प्रदर्शित केली होती. ज्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रश्मिकाचा इंटेन्स आणि रॉ लूक, तसेच दमदार बॅकग्राउंड स्कोअरचीही जोरदार चर्चा होत आहे. संगीतकार Jakes Bejoy यांचे संगीत आणि जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्समुळे हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार आहे.

https://www.instagram.com/stories/rashmika_mandanna/3854635118938492414/?utm_source=ig_story_item_share&igsh=MXBidGZ0OXhqeDEz

‘अनफॉर्मूला फिल्म्स’च्या निर्मितीत आणि Ravindra Pulle यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा ‘मैसा’ हा एक इमोशनल अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. आदिवासी भागावर आधारित असलेली ही कथा भव्य दृश्ये, दमदार कथानक आणि रश्मिकाची लक्षात राहणारी भूमिका यांचे आश्वासन देते.

follow us