रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने प्रथमच घेतले नाव

रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने प्रथमच घेतले नाव

Robert Vadra : विरोधी पक्षांकडून सातत्याने मोदी सरकारवर सरकारी संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातो. आता संजय भंडारी याच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering) ईडीने प्रथमच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांचे नाव घेतले आहे. ईडीने आरोप केला की रॉबर्ट वाड्रा यांनी लंडनमध्ये मनी लाँडरिंगद्वारे मिळवलेल्या प्रॉपर्टीचे नूतनीकरण केले आणि त्यात ते राहिले. कथित मध्यस्थ संजय भंडारी याच्याविरुद्ध लाँड्रिंग प्रकरणातून ही माहिती देण्यात आली आहे.

भंडारी 2016 मध्ये ब्रिटनला पळून गेला होता. ब्रिटिश सरकारने ईडी आणि सीबीआयच्या कायदेशीर विनंतीवर कारवाई करत या वर्षी जानेवारीमध्ये त्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली होती. परदेशात अघोषित संपत्ती असल्याच्या आरोपावरून ED आणि CBI संजय भंडारी याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि कर चुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी करत आहेत.

या प्रकरणात ईडीने वड्राचे नाव घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. ईडीने या प्रकरणी दुबईस्थित अनिवासी भारतीय उद्योगपती चेरुवाथूर चकुट्टी थंपी आणि यूकेचे नागरिक सुमित चड्डा यांच्याविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केल्याचे निवेदन जारी केले आहे.

थम्पीला या प्रकरणात जानेवारी 2020 मध्ये अटक करण्यात आली होती आणि ईडीने आरोप केला होता की तो वाड्राचा जवळचा सहकारी होता. थंपी सध्या जामिनावर बाहेर आहे. संजय भंडारी याच्याकडे विविध अघोषित परकीय उत्पन्न आणि संपत्ती आहे. यामध्ये 12 नंबर ब्रायनस्टन स्क्वेअर, लंडन आणि 6 ग्रॉसव्हेनर हिल कोर्ट ही लंडन येथे मालमत्ता आहेत.

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू महिला, कोण आहेत सवीरा प्रकाश?

ईडीने आरोप केला की, पीएमएलएच्या तरतुदींनुसार या मालमत्ता काळ्या पैशातून मिळवल्या गेल्या आहेत आणि सीसी थम्पी आणि सुमित चड्ढा हे लपवून त्यांचा वापर करण्यात गुंतले आहेत. तपासात असे आढळून आले आहे की थम्पी हे रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्तीय आहेत. रॉबर्ट वाड्रा सुमित चड्ढा यांच्यामार्फत 12 ब्रायनस्टन स्क्वेअर, लंडन येथे वरील प्रॉप्टीचे नूतनीकरण तर केलेच, पण त्याच ठिकाणी वास्तव्यही केले. रॉबर्ट वड्रा आणि थंपी यांनी फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आणि एकमेकांसोबत आर्थिक व्यवहार केला,” असा दावा ईडीने केला आहे.

ईडीने यापूर्वीच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती वाड्रा यांची चौकशी केली असून त्यांनी काहीही चुकीचे केल्याचा इन्कार केला आहे.

Israel Embassy परिसरात स्फोट; दिल्लीमध्ये खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

ईडीने सांगितले की दिल्ली न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत दाखल केलेल्या पुरवणी फिर्यादी तक्रारीची 22 डिसेंबर रोजी दखल घेतली.

अधिकृत सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर न्यायालयाने थंपी आणि चड्ढा यांनाही समन्स बजावले आहेत. ईडीने समन्स बजावल्यानंतरही चड्ढा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. भंडारी यांची भाची पूजा चड्ढा हिचा विवाह ब्रिटनमधील नागरिक सुमित चड्ढासोबत झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube