कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच; विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला
Vinesh Phogat : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. आता कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.
फोगटने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे. मला या परिस्थितीत आणल्याबद्दल सर्वशक्तिमान लोकांचे खूप आभार, असे पत्र तिने सोशल मीडिया X वर शेअर केले आहे.
विनेश फोगटच्या निर्णयावर सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला की तो अवाक आहे. कोणत्याही खेळाडूला हा दिवस पाहावा लागू नये. बजरंग पुनियानेही पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती.
फ्रान्सवरुन 276 प्रवाशांना घेऊन विमान मुंबईत दाखल; पण 27 प्रवासी तिथेच का थांबले?
दरम्यान, 21 डिसेंबर रोजी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या अगदी जवळचे संजय सिंह यांनी WFI अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. याच्या निषेधार्थ बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती.
मैं अपना मेजर ध्यानचंद खेल रत्न और अर्जुन अवार्ड वापस कर रही हूँ।
इस हालत में पहुँचाने के लिए ताकतवर का बहुत बहुत धन्यवाद 🙏 pic.twitter.com/KlhJzDPu9D
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) December 26, 2023
पुनियाने पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी आणि त्यांना पत्र सुपूर्द करण्यासाठी संसदेत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्याला थांबवले. यानंतर त्याने पद्मश्री पदपथावर ठेवून दिला होता.
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू महिला, कोण आहेत सवीरा प्रकाश?
अध्यक्ष असताना महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंकडून करण्यात आले होते. त्यासाठी जंतर-मंतरवर कुस्तीपटूंनी 39 दिवस उपोषण देखील केले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कुस्ती संघाच्या पुन्हा एकदा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. मात्र यामध्ये ब्रिजभूषण यांचे जवळचे असणारे संजय सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यामुळे खेळाडूंनी पुन्हा एकदा विरोध केला होता. खेळाडूंच्या विरोधानंतर सरकारने संजय सिंह यांच्यासह संपूर्ण कुस्ती संघच निलंबित केला होता.