फ्रान्सवरुन 276 प्रवाशांना घेऊन विमान मुंबईत दाखल; पण 27 प्रवासी तिथेच का थांबले?

फ्रान्सवरुन 276 प्रवाशांना घेऊन विमान मुंबईत दाखल; पण 27 प्रवासी तिथेच का थांबले?

मुंबई : मानवी तस्करीच्या संशयावरुन (human trafficking) फ्रान्समध्ये चार दिवस थांबविण्यात आलेले विमान 26 डिसेंबरला 276 प्रवाशांसह मुंबई विमानतळावर (Mumbai airport) पोहोचले. रोमानियाच्या लीजेंड एअरलाइन्सचे एअरबस A-340 विमानाने सोमवारी (25 डिसेंबर) दुपारी 2.30 वाजता फ्रान्समधील व्हॅट्री विमानतळावरून उड्डाण केले आणि पहाटे चार वाजता मुंबई विमानतळावर पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील बहुतांश भारतीय प्रवासी होते, त्यापैकी एक तृतीयांश गुजरातचे होते. संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथून या विमानाने गुरुवार (20 डिसेंबर) मध्य अमेरिकेतील निकाराग्वाला जाण्यासाठी झेप घेतली होती. पण आता हे निकाराग्वा ऐवजी मुंबईत का उतरवण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (plane, which was stopped in France for four days on suspicion of human trafficking, reached Mumbai airport on December 26 with 276 passengers)

विमानात होते 303 प्रवासी :

दुबईतून निघालेल्या विमानात एकूण 303 प्रवासी होते, मात्र मुंबईला पोहोचलेल्या विमानात केवळ 276 प्रवासी होते. उर्वरित 27 जण फ्रान्समध्येच आहेत. यातील 25 जणांनी फ्रान्समध्ये आश्रयासाठी अर्ज करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. थोडक्यात 25 जणांनी फ्रान्समध्ये आश्रय मागितला आहे, तर उर्वरित दोन जणांना चौकशीसाठी थांबविण्यात आले होते. चौकशीनंतर या दोघांनाही फ्रान्समधून बेदखल करण्यात आले आहे.

मानवी तस्करीच्या संशयावरुन थांबविलेले विमान :

दुबईतून निघालेले विमान फ्रान्समध्ये इंधन भरण्यासाठी थांबले होते. तेव्हा तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना मानवी तस्करी झाल्याचा संशय आला. त्यानंतर पॅरिसपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हॅट्री विमानतळावर 303 प्रवाशांसह विमान थांबविण्यात आले.

Maratha Reservation : आईच्या जातीचं प्रमाणपत्र मुलांनाही मिळू शकतं का?

तीन दिवसांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर सोमवारी या विमानाला मुंबईसाठी रवाना करण्यात आले. सुरुवातीला सकाळी 10 वाजता उड्डाण घेईल अशी अपेक्षा होती.पण काही प्रवाशांना त्यांच्या मूळ देशात जाण्यास नकार दिला. 25 जणांनी फ्रान्समध्ये आश्रयासाठी अर्ज करण्याची इच्छा व्यक्त केली.

ऐनवेळी झालेल्या या गोंधळामुळे विमानाला उशीर झाला. आता पॅरिस विमानतळावर आश्रय अर्जांची तपासणी केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, आश्रय मागणाऱ्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवता येत नाही.

अमेरिकेत अवैध प्रवेशासाठी निकाराग्वा हे प्रसिद्ध ठिकाण :

अमेरिकेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या स्थलांतरितांसाठी निकाराग्वा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. दरवर्षी अनेक स्थलांतरित बेकायदेशीरपणे अमेरिकन सीमेवर प्रवेश करतात. 2023 या आर्थिक वर्षात 96 हजार 917 भारतीयांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 51.61 टक्क्यांनी अधिक आहे.

Raju Shetty : लोकसभेसाठी आमचे सहा जागांवर लक्ष; राजू शेट्टींच्या स्वबळाच्या नाऱ्याचा फटका कुणाला बसणार?

फ्रान्समधील भारतीय दूतावासाने मानले सरकारचे आभार :

फ्रान्समधील भारतीय दूतावासाने 25 डिसेंबर रोजी ‘X’ वर ट्विट करून फ्रेंच सरकारचे आभार मानले. ट्विटमध्ये म्हंटले की, “भारतीय प्रवाशांना परत आणण्यासाठी आणि या प्रकरणाचे त्वरित निराकरण करण्यासाठी, प्रवाशांच्या सुरक्षित परतीचा प्रवास घडविण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असलेल्या दूतावासाच्या टीमसोबत जवळून काम केल्याबद्दल फ्रान्स सरकार आणि विट्री विमानतळाचे आभार.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube