Raju Shetty : लोकसभेसाठी आमचे सहा जागांवर लक्ष; राजू शेट्टींच्या स्वबळाच्या नाऱ्याचा फटका कुणाला बसणार?
Raju Shetti : देशभरात सध्या सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तयारीला लागले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी त्यांच्यासोबत जाण्यासाठी स्थानिक पक्षांनी चर्चा सुरू केली आहे. मात्र या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या भूमिकेमुळे युती किंवा आघाडी कुणाला फटका बसणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकसभेसाठी आमचे सहा जागांवर लक्ष…
राजू शेट्टी यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, आम्हाला महायुती आणि महाआघाडी दोन्हींचाही अनुभव वाईट आहे. त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये आम्ही फारसे लक्ष दिलेले नाही. मात्र आम्ही राज्यातील सहा जागांवर लक्ष केंद्रित केलं असल्यास देखील राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं.
Chhagan Bhujbal : महायुतीत समसमान जागावाटप व्हावं, अजितदादा गटाच्या दाव्यानं भाजपची कोंडी?
तसेच ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असतानाच आम्ही आघाडीमधून बाहेर पडलो. मात्र आम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्ही बाहेर का पडला? याची साधी विचारला देखील कोणी केली नाही. आमच्याशी कोणताही संपर्क साधला गेला नाही. महाविकास आघाडीच्या काही धोरणांवर आक्षेप घेत आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो.
Christmas Day 2023 : अल्लू अर्जुन अन् राम चरण खास पद्धतीने साजरा केला ख्रिसमस
मात्र आम्हाला त्याचे कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा तिथे जाऊन काहीही उपयोग नाही. असेही यावेळी शेट्टी म्हणाले. तर आपण हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, म्हाडा, बुलढाणा आणि परभणी राज्यातील या सहा लोकसभा मतदारसंघांवर आपलं लक्ष केंद्रित केलं, असल्यास देखील यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितलं. त्यामुळे आता राजू शेट्टींच्या भूमिकेचा फटका नेमका कुणाला बसतो? हे आगामी निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे.
तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी या विरोधकांच्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सहभागी होणार असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सामील करण्यासाठी मी व्यक्तिगत पातळीवर सकारात्मक आहे. पण इंडिया आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होईल. कारण इंडिया आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यास मतांचे विभाजन टाळता येईल. असे यावेळी अशोक चव्हाण यांनी सांगितलं.