Raju Shetti : ‘ईडी’च्या भीतीने उंदरासारखे पळाले; राजू शेट्टींच्या निशाण्यावर नेमकं कोण?

Raju Shetti : ‘ईडी’च्या भीतीने उंदरासारखे पळाले; राजू शेट्टींच्या निशाण्यावर नेमकं कोण?

Raju Shetti : यंदाच्या गळीत हंगामात उसाला साडेतीन हजार रुपये भाव द्यावा. मागील वर्षातील चारशे रुपयांचा राहिलेला हप्ता मिळावा या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावेळी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर घणाघाती टीका केली. आज गुरुवारी कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या बैठकीत ऊसदराचा हिशोब मांडू. त्यावर तोडगा निघाला नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी त्यांना विमानतळावरच घेराव घालू. सर्वत्र चक्का जाम आंदोलन करू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

कर्नाटकातील ऊस पोलीस बंदोबस्तात आणण्यासाठी पोलिसांना ठेका, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

राजू शेट्टी पुढे म्हणाले, शांततेच्या मार्गाने मागील दीड महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. पण सत्ताधारीच काय विरोधी पक्षातील नेते सुद्धा चकार शब्द काढायला तयार नाहीत. यामागे कारण आहे. या सगळ्यांचे साखर कारखाने आहेत. कारखान्यात केलेली गैरकृत्ये बाहेर पडू नयेत यासाठी ईडी कारवाईच्या भीतीने इकडे तिकडे उंदरासारखी पळत सुटले आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी प्रश्न केला की हे आंदोलन तुमच्यावर लादलं आहे का? तुम्ही इच्छेविरुद्ध आंदोलन करत आहात का? त्यावर शेतकऱ्यांनी हात उंचावून नाही असे म्हटले आणि आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. मागील चारशे रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहण्याची तयारी आहे का, असे विचारल्यानंतर पंधरा दिवसच काय महिनाभरही वाट पाहू पण, आंदोलन सुरुच ठेऊ असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

.. तर उसाच्या कांड्याने फोडून काढू 

याला फक्त उद्धव ठाकरे अपवाद आहेत. कारण त्यांच्याकडे साखर कारखाने नाहीत. ज्या ताकदीने साखर कारखानादार ऊस आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करतील तितक्याच ताकदीने आंदोलन पुढे रेटले जाईल. शेतकऱ्यांच्या अंगावर बाऊन्सर घालण्याचा प्रयत्न केला तर उसाच्या कांड्याने फोडून काढू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

राजू शेट्टींना शरद पवारांचा भरवसाच नाही; म्हणाले, मला त्यांच्याबाबत..

शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील ऊस बाहेर निर्यात करण्यावर बंदी घातली होती. त्यामुळं राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झाले होते. निर्यातबंदी हटवण्यासाठी आणि उसाला दुसरा हप्ता 400 रुपये देण्यासह अन्य काही मागण्यांसाठी शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी आक्रोश पदयात्रा काढली होती. त्यानंतर आता त्यांनी अन्य राज्यातील ऊस महाराष्ट्रात आणण्यासाठी पोलीस सुपारी घेऊन काम करत आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube