Chhagan Bhujbal : महायुतीत समसमान जागावाटप व्हावं, अजितदादा गटाच्या दाव्यानं भाजपची कोंडी?
Chhagan Bhujbal : देशात अन् राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections)वारं चांगलेच वाहू लागले आहे. राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)आणि महायुतीमध्ये जागावाटपाबद्दल अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यातच आता महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाएवढेच (Shivsena Shinde Group) आमचेही आमदार असल्याने त्यांच्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group)नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना एकच उधाण आलं आहे.
Ahmednagar Crime : अवैध धंद्यांची तक्रार केली म्हणून राजकीय गुंडांकडून वकिलाला बेदम मारहाण
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे जागावाटपाबद्दल त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. जेवढे शिंदे गटाचे आमदार आहेत. तेवढेच आमचे अजितदादा गटाचे आमदार आलेले आहेत.
जॅकलिननं ब्लॅक सूट घातला नाही म्हणून चिडला; सुकेशचा तुरुंगातील आणखी एक कारनामा उघड
त्यामुळे आता सारासार विचार करता, त्यांच्याप्रमाणेच आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं, त्यात चुकीचं काय आहे? बरोबर आहे त्यांचं मत असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी अजितदादांच्या मताचं समर्थन केलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर आज अजितदादांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यामध्ये त्यांच्या गटाची लोकसभा निवडणुकीविषयीच्या चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात भाजपचे केंद्रीय नेतृत्वाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या गटाची बैठक होणार आहे. त्याआधी अजितदादांच्या गटाकडून अशा प्रकारे जागावाटपाची मागणी करुन एकप्रकारे वातावरण निर्मिती केली जात आहे.
आत्ताची परिस्थिती पाहिली तर शिदे गटाचे 13 खासदार आहेत तर अजितदादा गटाचे 4 खासदार आहेत. तर महायुतीमध्ये भाजपचे 105 आमदार आहेत, शिवसेना शिंदे गटाचे 50 पेक्षा जास्त आमदार आहेत आणि अजितदादा गटाचे 43 आमदार असल्याचा दावा केला दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे.