…तर ते व्यासपीठावर नाचतील! काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा बिहारमधून पंतप्रधान मोदींवर थेट वार
मी देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याला भेट दिली आहे आणि मी जिथे जिथे जातो तिथे मला बिहारमधील कष्टाळू तरुण काम करताना दिसतात.
बिहारमध्ये सध्या विधानसभेचा प्रचार जोरात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरलेले आहेत. (Modi) प्रचारात जोरदार वार पलटवार सुरू आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीय यांच्यावर जोरदार हमला केला आहे. जर तुम्ही नरेंद्र मोदींना तुमच्या मतांच्या बदल्यात नाचायला सांगितले, तर ते व्यासपीठावर नाचतील असा हल्ला राहुल गांधी यांनी केला आहे.
आतापर्यंत तुम्हाला जे काही मिळाले आहे, मग ते मतदानाचा अधिकार असो, शिक्षण असो किंवा आरोग्य असो, ते संविधानामुळेच मिळाले आहे. पण, नरेंद्र मोदी आणि आरएसएस संविधानावर हल्ला करत आहेत. जेव्हा ते मते चोरतात तेव्हा ते संविधानावर हल्ला करतात. जेव्हा ते एखाद्या संस्थेला कमकुवत करतात किंवा आरएसएसशी संबंधित एखाद्या व्यक्तीला कुलगुरू म्हणून नियुक्त करतात तेव्हा ते संविधानावर हल्ला करतात. मी स्पष्टपणे सांगतो आम्ही संविधानाचं रक्षण करू आणि कोणीही ते नष्ट करू शकत नाही असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
धक्कादायक! वेगवेगळ्या कंपन्यांनी तब्बल 1 लाख 70 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, काय कारण?
मी देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याला भेट दिली आहे आणि मी जिथे जिथे जातो तिथे मला बिहारमधील कष्टाळू तरुण काम करताना दिसतात. त्यांनी दिल्ली बांधली, बेंगळुरूचे रस्ते बांधले आणि गुजरात आणि मुंबईच्या विकासात मोठे योगदान दिले. दुबईसारखी ठिकाणेही त्यांच्या मेहनतीने बांधली गेली. मग प्रश्न असा आहे की, जर बिहारचे लोक संपूर्ण देश आणि जग बांधू शकतात, तर ते स्वतःचा बिहार का बांधू शकत नाहीत? नितीश कुमार गेल्या २० वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. ते स्वतःला अत्यंत मागासलेले म्हणतात, पण शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या क्षेत्रात त्यांनी काय सुधारणा केल्या आहेत का? असा थेट प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
छठ पूजेसाठी भाविक दिल्लीतील प्रदूषित यमुनेत प्रार्थना करत होते, तर पंतप्रधानांनी खास त्यांच्यासाठी बनवलेल्या विशेष तलावात डुबकी मारली. त्यांचा यमुनेशी काहीही संबंध नाही. त्यांचा छठ पूजेशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त तुमची मते हवी आहेत. नीतीश कुमार यांचा चेहरा वापरला जात आहे. पण, रिमोट कंट्रोल भाजपाच्या हातात आहे. तुम्ही असा विचार करू नका की ते सर्वात मागासलेल्या लोकांचा आवाज ऐकतात, जर तुम्ही नरेंद्र मोदींना तुमच्या मतांच्या बदल्यात नाचायला सांगितले, तर ते व्यासपीठावर नाचतील, असा घणाघात खासदार राहुल गांधी यांनी बिहारमधील प्रचार सभेमध्ये केला आहे.
