‘ती’ आत्महत्या नाही तर हत्या…, फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राहुल गांधींचा गंभीर आरोप
यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे होती. या प्रकरणात विरोधकांकडून भाजपच्या नेत्यावरही गंभीर आरोप केले.
फटलण डॉक्टर आत्महत्या आणि बलात्कार प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींकडून (Phaltan) मोठा आरोप करण्यात आला आहे. महिला डॉक्टरांनी आत्महत्या केली नाही, तर ही हत्याच आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी भाजपवरही गंभीर आरोप केला आहे. महिला डॉक्टरने अलिशान हॉटेलमध्ये आत्महत्या केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे होती. या प्रकरणात विरोधकांकडून भाजपच्या नेत्यावरही गंभीर आरोप केले.
फलटण प्रकरणावरून राज्यात वातावरण तापलं असतानाच आता यामध्ये राहुल गांधी यांनाही उडी घेतली. राहुल गांधी यांनी ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे. जेव्हा सत्ता गुन्हेगारांना वाचवते, तेव्हा न्याय कसा मिळणार? या न्यायाच्या लढाईत आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत ठामपणे उभे आहोत. आता भारताच्या प्रत्येक मुलीला भीती वाटता कामा नये. आम्हाला न्याय हवा, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांनी भाजप सरकारवरही गंभीर आरोप केला. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, ज्यांना गुन्हेगारांपासून जनतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्यांनीच या निष्पाप मुलीविरुद्ध सर्वात घृणास्पद गुन्हा केला. तिच्यावर बलात्कार आणि शोषण केले. दरम्यान, राहुल गांधींच्या गंभीर आरोपाला भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळतेय, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात.
फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणात त्यांना; सोडणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्रातील साताऱ्यात महिला डॉक्टरची बलात्कार आणि छळामुळे आत्महत्या करावी लागणे ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या अंतःकरणाला हादरवणारी शोकांतिका आहे. एक हुशार डॉक्टर मुलगी, जी इतरांचे दुखः दूर करण्याची इच्छा बाळगून होती, ती भ्रष्ट सत्ता आणि व्यवस्थेत बसलेल्या गुन्हेगारांच्या छळाला बळी पडली. ज्यांना गुन्हेगारांपासून जनतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्यांनीच या निष्पाप मुलीविरुद्ध सर्वात घृणास्पद गुन्हा केला. तिच्यावर बलात्कार आणि शोषण केले.
अहवालानुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचाराचा दबाव आणण्याचा प्रयत्नही केला.सत्तेने संरक्षित गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही – ही संस्थात्मक हत्या आहे.जेव्हा सत्ता गुन्हेगारांची ढाल बनते, तेव्हा न्यायाची आशा कोणाकडून ठेवायची? या घटनेने भाजप सरकारचा अमानवीय आणि संवेदनाहीन चेहरा उघड केला आहे. आम्ही न्यायाच्या या लढ्यात पीडित कुटुंबासोबत ठामपणे उभे आहोत. भारतातील प्रत्येक मुलीसाठी – आता भीती नको, न्याय हवा.
