फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मित्राच्या फार्म हाऊसहून दुसरा आरोपी बनकर अटकेत
Satara Phaltan doctor suicide case आता मोठी अपडेट समोर आली आहे. कारण या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे.
Satara Phaltan doctor suicide case update another Accues Prashant Bankar Arrested : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली. त्यानंतर पोलीस प्रशासनासह लोकप्रतिनिधी विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झालं आहे. पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप आणि गुन्हेगारांना मदत केल्याचे दावे केले जात आहेत. त्यात आता मोठी अपडेट समोर आली आहे. कारण या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे.
राज्यात पुढील 2 दिवस पुन्हा पाऊस! मुंबईसह मराठवाडा, उ. महाराष्ट्राला येलो अलर्ट
फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकारात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी असलेल्या प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रशांत बनकरवर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप आहेत. मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसला असताना त्याला पकडण्यात आला आहे. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई करत बनकरला बेड्या ठोकल्या आहेत. ग्रामीण पोलिसांनी अटक करून बनकरला शहर पोलिसांकडे सोपवला आहे. गेल्या 24 तासांपासून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता. त्यानंतर अखेर बनकरला अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
ताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये या मृत महिला डॉक्टरच्या भावाने खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये खासदाराचे पीए तिच्यावर दबाव टाकत होते. त्यांनी खासदारांना फोन लावून दिला असता त्यांनी देखील तिच्याशी बोलने केले होते. असा आरोप केला आहे.
https://x.com/PTI_News/status/1981962496325169483
जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या अन्यथा… भाजपमधील जोरदार इन्कमिंगवरून गडकरींचा इशारा
दरम्यान यात संबंधित महिला डॉक्टरने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendr Fadnavis) यांनी संबधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित पीएसआय बदनेचं तात्काळ निलंबन तर, बनकरच्या अटकेचे आदेश दिले आहेत.त्यानंतर आता थेट फलटण भागातील खासदारांचे नाव देखील यामध्ये या महिला डॉक्टरच्या भावाने केले आहे. त्यामुळे नाव न समोर आलेले हे खासदार कोण? अशा अनेक प्रश्नांना या प्रकरणाने तोंड फोडले आहे.
