बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, 18 जिल्ह्यांमधील 121 जागांवर कोण मारणार बाजी?
Bihar Election 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 पासून सुरुवात
Bihar Election 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आज 18 जिल्ह्यांमधील 121 जागांवर मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 3 कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, ज्यात 1 कोटी 98 लाख पुरुष, 1 कोटी 76 लाख महिला आणि तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तर दुसरीकडे आज पहिल्या टप्प्यात तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा आणि बिहार सरकारच्या अनेक मंत्र्यांसह अनेक प्रमुख व्यक्तींचे भवितव्य ठरणार आहे.
पहिल्या टप्प्यातील चर्चित जागा
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री मंगल पांडे (Mangal Pandey) पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ते सिवान मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, जिथे त्यांचा सामना ज्येष्ठ राजद नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांच्याशी आहे. सिवानला (Bihar Election 2025) लागून असलेली रघुनाथपूर जागा देखील चर्चेत आहे, जिथे दिवंगत माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचे पुत्र ओसामा शहाब निवडणूक लढवत आहेत.
इतर लोकप्रिय उमेदवारांमध्ये भाजपची तरुण लोकगायिका मैथिली ठाकूर (अलीनगर), आरजेडीचे भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव (छपरा) आणि जन सूरज पार्टीचे गायक रितेश पांडे (कारगहर) यांचा समावेश आहे.
मतदानापूर्वी तेजस्वी यादव यांनी काय आवाहन केले?
राजद (RJD) नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये बिहारच्या लोकांना मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले. व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “बिहारच्या नशिबाचे निर्माते असलेल्या सर्व लोकांना माझा सलाम. आज मतदानाचा एक महत्त्वाचा दिवस आहे. बिहारचे भविष्य तुम्ही दाबलेल्या एका बटणाने ठरवले जाईल. लोकशाही, संविधान आणि मानवतेसाठी मतदान करणे आवश्यक आहे.
मी सर्व मतदारांना, विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या जेन- झी मतदारांना, माता आणि बहिणींना, व्यापारी, शेतकरी, इतर राज्यात राहणारे स्थलांतरित, प्रत्येक सामान्य नागरिक, नोकरी शोधणारा प्रत्येक विद्यार्थी, त्यांच्या आजारांवर उपचार घेत असलेला प्रत्येक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना आणि बिहारमधील प्रत्येक पात्र नागरिकाला काहीही झाले तरी मतदान करण्याचे आवाहन करतो.
मेषसह ‘या’ राशींसाठी आज मिळणार आनंदाची बातमी; जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती
तुम्ही सर्वांनी मतदान केले तरच बिहार समृद्ध होईल. तुमचे मतदान बिहारच्या प्रगतीसाठी संधी निर्माण करेल. म्हणून बिहारच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करण्याचे लक्षात ठेवा.
