मोठी बातमी! दिल्ली स्फोटातील मास्टरमाईंडला अटक, एनआयएची मोठी कारवाई

दिल्ली दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या आय२० कारच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. त्याने उमरसोबत मिळून कट रचला होता.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 16T193113.539

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएला (NIA) मोठी कारवाई करण्यात यश आलं आहे. या आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा दहशतवादी कट रचणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

आमिर रशीद अली असं अटक करण्यात आलेला आरोपीचच नाव आहे. स्फोटात वापरलेली कार त्याच्या नावावर नोंदणीकृत होती. एनआयएने त्याला दिल्लीत अटक केली. सुरुवातीला दिल्ली पोलीस स्फोटाचा तपास करत होते. परंतु, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. एनआयएने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली, ज्यामध्ये आमिरला अटक करण्यात आली.

दिल्ली स्फोटाशी कनेक्शन ! जम्मू-काश्मीरच्या नौगाम पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू 29 हून अधिक जखमी

आमिर हा जम्मू आणि काश्मीरमधील पंपोर येथील सांबुरा येथील रहिवासी आहे. त्याने पुलवामा येथील उमर उन नबी नावाच्या व्यक्तीसोबत सहकार्य करून हल्ल्याची योजना आखली होती. आमिर दिल्लीत कार खरेदी करण्यास मदत करण्यासाठी आला होता, जी नंतर स्फोटासाठी आयईडी (बॉम्ब बनवण्याचे उपकरण) म्हणून वापरली गेली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

follow us