Delhi Blast : रूग्णसेवा ते दहशतवादी कट; डॉ. शाहीन नोकरी सोडून अशी बनली जैशची ‘रिक्रूटर’
शाहीनच्या खासगी आयुष्य बघितले तर, तेही तितकेच गुंतागुंतीचे आहे. तिचे लग्न पीएमएस डॉक्टर असलेल्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. हयात जफर यांच्याशी झाले होते.
How Doctor Shaheen Sayeed Turned Jaish Recruiter : राजधानी दिल्लीत 10 नोव्हेंबरला संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाबाबत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या भीषण स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. दिल्लीत घडवून (Delhi Blast) आणलेल्या या हल्ल्यात जम्मू आणि काश्मीरपासून हरियाणा आणि उत्तर प्रदेशपर्यंत कार्यरत असलेल्या “व्हाईट कॉलर” दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला असून, या हल्ल्याची मास्टरमाईंड एक उच्चशिक्षित महिला डॉक्टर शाहीन सईद (Shaheen Sayeed) असल्याचे आता समोर येतयं. रूग्णसेवा ते दहशवादी कट नेमकी डॉ शाहीन सईद जैश-ए-मोहम्मद या संघटनेची रिक्रूटर कशी बनली त्याबद्दल जाणून घेऊया…
दिल्ली अन् लाल किला नाही तर आयोध्येतील राम मंदिर…; स्फोट घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती
शाहीन अभ्यासात हुशार होती, पण नोकरी सोडली अन् गायब झाली
शाहीन सईदचा जन्म 1979 मध्ये लखनौ येथे झाला. तिने लालबाग गर्ल्स इंटरमीडिएट कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि अभ्यासात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली. शाहीनचे वडील सईद अन्सारी सांगतात की, “शाहीनला नेहमीच डॉक्टर व्हायचं होतं. आईच्या आजारपणात डॉक्टरांकडून केले जाणारे उपचार ती बारकाईने बघत असे. यातूनच तिने मोठेपणी रूग्णसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. 2003 मध्ये एमबीबीएस आणि 2005 मध्ये कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमधून तिने औषधनिर्माणशास्त्रात एमडी केले त्यानंतर शाहीनची उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने निवड केली.
ऑगस्ट 2006 मध्ये, ती जीएसव्हीएममध्ये औषधनिर्माणशास्त्र विभागात व्याख्याता म्हणून रुजू झाली. मात्र, 2009-10 मध्ये कन्नौज मेडिकल कॉलेजमध्ये बदली झाल्यानंतरही शाहीन जीएसव्हीएममध्ये पुन्हा परतली. सात वर्षे काम केल्यानंतर, 2013 मध्ये शाहीन अचानक कोणतीही पूर्व कल्पना न देता गायब झाली. अचानक कामावर येणे बंद केल्याने कॉलेजने शाहीनला वारंवार सूचना पाठवल्या, परंतु तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, 2021 मध्ये सरकारने तिला बडतर्फ केले. तिच्या बडतर्फीनंतर शाहीनने लखनऊच्या इंटिग्रल युनिव्हर्सिटीमध्ये डॉ. परवेझ सईदचा (तिचा भाऊ) पत्ता देऊन अनुभव प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला.
धक्कादायक! दिल्लीतील स्फोटानंतर पाकिस्तानी नागरिकांची गूगल सर्च हिस्ट्री समोर; पाहा संपूर्ण लिस्ट
अशांत जीवन : घटस्फोट आणि सहारनपूर कनेक्शन
शाहीनच्या खासगी आयुष्य बघितले तर, तेही तितकेच गुंतागुंतीचे आहे. तिचे लग्न पीएमएस डॉक्टर असलेल्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. हयात जफर यांच्याशी झाले होते. मात्र, 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर, शाहीनने काही काळ दिल्लीत काम केले आणि नंतर फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठात प्रवेश घेतला, जिथे तिची डॉ. मुझम्मिल गनई आणि डॉ. उमर नबी यांच्याशी भेट झाली.
दिल्ली स्फोटानंतर करण्यात आलेल्या तपासात असे दिसून आले की, शाहीनचे सहारनपूरमध्येही खोलवर संबंध होते. परवेझचं तिथे एक क्लिनिक होते आणि 6 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीर पोलिसांनी सहारनपूरमधील अंबाला रोड हॉस्पिटलमधून डॉ. आदिल अहमदला अटक केली. आदिलच्या अटकेमुळे मुझम्मिलचे नाव पुढे आले, ज्याने शाहीनचा उल्लेख केला. गुप्तचर संस्था आता शाहीन आणि परवेझच्या जैश-ए-मोहम्मदच्या संबंधांची चौकशी करत आहेत. फरीदाबाद अटकेनंतर परवेझ फरार आहे आणि त्याच्या घरातून जप्त केलेल्या कागदपत्रांवरून दहशतवादी निधीचे पुरावे उघड झाले आहेत.
श्रीनगरमधील एक पोस्टर अन् NCR वर हल्ल्याचं प्लॅनिंग; पोलिसांना Sleeper Cell कसे सापडले?
जैश-ए-मोहम्मदची ‘महिला कमांडर’: कट्टरतावादाचा भयानक चेहरा
दिल्ली पोलीस आणि जम्मू-काश्मीर एटीएसच्या मते, शाहीन ही जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरची बहीण सादिया अब्बास (उर्फ सहिदा) हिच्याशी थेट संपर्कात होती. ऑक्टोबरमध्ये जैश-ए-मोहम्मदने त्यांची पहिली महिला शाखा जमात-उल-मोमिनत स्थापन केली आणि शाहीनची भारतातील प्रमुख म्हणून नियुक्त केली. महिलांना दहशतवादी बनवणे, भरती करणे आणि लॉजिस्टिकल सपोर्ट प्रदान करणे ही तिची भूमिका होती. फरीदाबाद मॉड्यूलमध्ये, शाहीनने निधी उभारला आणि शस्त्रे लपवल्याचेही समोर आले आहे. त्याशिवाय तपासात असे दिसून आले की, दोन वर्षांत 2,900किलो अमोनियम नायट्रेट, आरडीएक्स, एके-47 रायफल आणि पिस्तूल जमा करण्यात आले आहे.
पाकिस्तानी हँँडलरशी शाहीन संपर्कात
11 नोव्हेंबर रोजी शाहीनला अटक केल्यानंतर, तिच्या मारुती स्विफ्ट कारमधून एक असॉल्ट रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. ती रायफल कचऱ्याच्या डब्यात टाकण्याचा प्रयत्न करत होती. मॉड्यूलचे आठ आरोपी अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित डॉक्टर आहेत. स्फोटात आत्मघाती बॉम्बर डॉ. उमर नबी असल्याचे मानले जाते. स्फोट झाला तेव्हा तो कार चालवत होता. मुझम्मिल गनईच्या भाड्याच्या फ्लॅटमधून स्फोटके जप्त करण्यात आली असून, पुलवामा हल्ल्याशीही संबंध समोर येत आहेत. शाहीनने गुप्त सोशल मीडिया चॅनेलद्वारे पाकिस्तानी हँडलर्सशी संपर्क राखत होती.
मोठी बातमी! दिल्लीत स्फोट झालेल्या कारचा मालक कोण?, नाव आलं समोर
तपासाची व्याप्ती महाराष्ट्रापासून झारखंडपर्यंत वाढविली
दिल्ली स्फोटाची फॉरेन्सिक चौकशी एनआयए आणि एफएसएल टीम करत आहेत. लाल किल्ला मेट्रो गेट क्रमांक 1 वर अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि डेटोनेटर्सने भरलेली कार थांबवण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित उमर असण्याची शक्यता वर्तवली जात असून,शाहीनचे महाराष्ट्र कनेक्शनदेखील तपासले जात आहे. घटस्फोटापूर्वी शाहीनचे काहीकाळ महाराष्ट्रात वास्तव्य होते. लखनऊमधील तिचा भाऊ परवेझच्या घरी छापा टाकण्यात आला, जिथे हार्ड ड्राइव्हमधून डेटा जप्त करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये 20 हून अधिक लोकांची चौकशी केली जात आहे. सहारनपूर, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्ये शोध मोहीम सुरू आहे.
रूग्णसेवेपासून दहशतवादी नेटवर्कपर्यंतचा प्रवास
दिल्ली स्फोटानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात अलर्ट जारी केला आहे. शाहीनच्या अटकेवरून हे सिद्ध होते की, आता सुशिक्षित चेहऱ्यांमागून दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. एकेकाळी आईच्या आजाराने प्रेरित होऊन रूग्णसेवेचा मार्ग निवडणारी शाहीन मात्र, राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका बनली आहे. शाहीन साध्या मनाची होती आणि तिला रूग्णसेवा करायची होती. पण ती दहशतवादी नेटवर्कमध्ये कशी अडकल्याने शाहीनच्या घरच्यांनाही धक्का बसला आहे.
