दोषींना सोडणार नाही, दिल्ली बॉम्बस्फोटावर पंतप्रधान मोदींचा इशारा

PM Modi On Delhi Car Bomb Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ असणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या जवळ 10 नोव्हेंबर रोजी एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला.

  • Written By: Published:
PM Modi On Delhi Car Bomb Blast

PM Modi On Delhi Car Bomb Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ असणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या जवळ 10 नोव्हेंबर रोजी एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. या प्रकरणात सध्या दिल्ली पोलिसांसह इतर तपास यंत्रणा सखोल चौकशी करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वसन दिले आहे. दोन दिवसीय भूतान (Bhutan) दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोपींना इशारा देत  कट रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही असं म्हंटले आहे. पंतप्रधान मोदी भूतानची राजधानी थिंपूमध्ये (Thimpu) जनतेला संबोधित केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  आज मी खूप दुःखी मनाने येथे (भूतानला) आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयानक घटनेने सर्वांना खूप दुःख झाले आहे. मी पीडित कुटुंबांचे दुःख समजतो. आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे. आमच्या तपास यंत्रणा या कटाच्या तळाशी जातील. यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही असं प्रतपंधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 चौकी स्थापन करणार

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मी या व्यासपीठावरून आणखी एक महत्त्वाची घोषणा करत आहे. भारत पर्यटकांना आणि गुंतवणूकदारांना अधिक सुविधा देण्यासाठी नजीकच्या भविष्यात गेलेफूजवळ एक चौकी देखील बांधेल. भारत आणि भूतानची प्रगती आणि समृद्धी एकमेकांशी जोडलेली आहे आणि याच भावनेतून, गेल्या वर्षी भारत सरकारने भूतानच्या पंचवार्षिक योजनेसाठी 10,000 कोटींचे योगदान जाहीर केले. ही रक्कम रस्त्यांपासून शेतीपर्यंत, वित्त ते आरोग्यसेवेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात वापरली जात आहे, ज्यामुळे भूतानच्या नागरिकांचे जीवन सुकर होण्यास मदत होत आहे.

दिल्लीत बॉम्बस्फोट अन् पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावर, शांती प्रार्थना महोत्सवात होणार सहभागी

तसेच भूतकाळात, भारताने भूतानच्या लोकांना आवश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत आणि आता येथे UPI पेमेंट सुविधा देखील वाढवली जात आहे. आम्ही भूतानच्या नागरिकांना भारताला भेट देताना UPI वापरण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी देखील काम करत आहोत.

follow us