राहुल गांधींचा डुप्लिकेट? आसामचे मुख्यमंत्री आता नाव व पत्ताच उघड करणार
Himanta Biswa Sarma On Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आसाममधून (Assam)जात आहे. आता ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे. परंतु आसामचे भाजपचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी एक नवा दावा केला होता. या यात्रेत राहुल गांधी यांचा डुप्लिकेटचा वापर करण्यात येत असल्याचे हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. या डुप्लिकेट व्यक्तीचा पत्ता आणि नाव लवकर जाहीर करणार असल्याचे आता आसामचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.
Nitish Kumar : आता आम्ही कायमस्वरुपी.. CM बनल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना एक दावा केला होता. भारत जोडो न्याय यात्रेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या बॉडी डबलचा (डुप्लिकेट)चा वापर केला होता. आता ते थेट या व्यक्तीचे नाव आणि पत्ताच सांगणार आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेली ती व्यक्ती राहुल गांधी नाही आहे. फक्त काही दिवस थांबा ती व्यक्ती कोण आहे. त्याचे नाव व पत्ता लवकरच सांगणार असल्याचे हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.
‘माझ्या 5 मागण्या पूर्ण करा, मी राजकारण सोडतो’; केजरीवालांचं भाजपला थेट आव्हान
BIG NEWS 🚨 Assam CM Himanta Biswa Sarma said that he will soon share the name & address of Rahul Gandhi's "body double".
He said Rahul Gandhi's duplicate was used during Bharat Jodo Nyay Yatra in Assam.
"Just wait for few days, that person is not Rahul Gandhi at all. Will soon… pic.twitter.com/UxeDsVuVRs
— Times Algebra (@TimesAlgebraIND) January 28, 2024
भारत न्याय यात्रेतील बसमध्ये बसलेली व्यक्ती आणि लोकांना अभिवादन करणारी व्यक्ती ही राहुल गांधी नाही. मी केवळ बोलत नाही. त्या डुप्लिकेट व्यक्तीचे नाव आणि सर्व माहिती मी काही दिवसात लोकांना देणार आहे, असे हिमंत सरमा यांनी सोनितपूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात म्हटले आहे. मी उद्या डिब्रुगढ येथे राहणार आहे. त्यानंतर काही दिवस गुवाहाटीच्या बाहेर राहणार आहे. मी गुवाहाटीला गेल्यानंतर राहुल गांधीच्या डुप्लिकेटचे नाव उघड करणार असल्याचे सरमा यांनी म्हटले आहे.