भाजपच्या गळाला बडा मासा : काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्याविरोधातील उमेदवार ठरला?

भाजपच्या गळाला बडा मासा : काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्याविरोधातील उमेदवार ठरला?

Balasaheb Bhadane joins BJP : धुळ्यातील उद्योगपती बाळासाहेब भदाणे (Balasaheb Bhadane) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत त्याचा भाजप प्रवेश संपन्न झाला. धुळ्यामधील ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्यासमोर कोण उमेदवार द्यायचा याची चिंता भाजपसमोर होती. पण भदाणे यांच्या प्रवेशाने भाजपचे टेन्शन मिटल्याचे दिसून येत आहे.

धुळे शहर आणि ग्रामीण मतदारसंघात भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. हे दोन मतदारसंघ वगळता धुळे जिल्ह्यात भाजपची चांगली ताकद आहे. जिल्ह्यातील बहुतेक लहान-मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्था भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. त्यानंतर आता धुळे शहर आणि ग्रामीण मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. मध्यंतरी आमदार कुणाल पाटील यांच्या सुतगिरण्यांवर केंद्रिय तपास यंत्रणेचे छापे पडल्यानंतर ते भाजपात जाऊ शकतात अशी चर्चा होती. पण आता भदाणे यांच्या प्रवेशाने धुळे ग्रामीणमध्ये भाजप निश्चिंत झाली आहे.

रामदास आठवले शिर्डी लोकसभा लढवणारच…तयारी झाली; साळवेंनी स्पष्ट सांगितलं

आगामी विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीणची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे धुळे ग्रामीणमधील शिवसेनेचे इच्छुक नाराज होते. तेव्हापासून बोरकुंड गटात ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते मानले जाणारे बाळासाहेब भदाणे हे भाजपच्या जवळ गेले होते. त्याचवेळी कुणाल पाटील यांना आव्हान देईल असा उमेदवार भाजपकडे नव्हता. त्यासाठी भाजपनेही गेल्या दोन वर्षापासून तयारी सुरु केली होती. भाजपने भदाणे यांना पद्धतशीरपणे ठाकरे गटापासून बाजूला केले.

अखेर आदिती तटकरेंनी रायगड मिळविलेच; आता गोगावलेंच्या डोळ्यासमोरच फडकविणार ‘झेंडा’

भदाणे यांच्या पत्नी शालिनी भदाणे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहून भाजपला थेट मदत केली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रा.अरविंद जाधव यांच्या स्नुषा अश्विनी पाटील विजयी झाल्या. त्यानंतर धुळे पंचायत समितीतही बोरकुंड गटातील ठाकरे गटाचे सदस्य आणि इतर तीन अशा चार सदस्यांना घेऊन भदाणेंनी थेट भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर आता जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहून भाजपचा पर्याय निवडला असल्याचे दिसून येते. मात्र प्रा. जाधव हेही स्पर्धेत असल्याने नेमके तिकीट कोणाला मिळणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज